गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढताना दिसत आहेत. त्यातच आता भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे...
गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढताना दिसत आहेत. त्यातच आता भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 85.84 च्या पातळीवर घसरला आहे.
त्यामुळे या घसरणीचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. असे असताना पेट्रोल-डिझेलसह खाद्यतेल, डाळी महागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारत परदेशी बाजारातून कच्चे तेल खरेदी करतो. रुपयाच्या घसरणीमुळे पेट्रोलियम पदार्थांची आयात महागणार आहे. रुपयाच्या घसरणीमुळे आयात महाग झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचा धोका असून, त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. डिझेलच्या किमती वाढल्याने मालवाहतूक वाढेल, त्यामुळे महागाई वाढू शकते. तसेच रुपयाच्या घसरणीमुळे परदेशी शिक्षण महाग होऊ शकते. कारण प्रत्येक डॉलरसाठी अधिक रुपये मोजावे लागतील. याचा परिणाम हजारो भारतीय विद्यार्थी आणि परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात. डाळी आणि खाद्यतेल महाग होऊ शकतात. भारत खाद्यतेल आणि डाळींची मोठ्या प्रमाणावर आयात करतो. रुपयाच्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेल आणि डाळींच्या किमती वाढू शकतात. त्याचबरोबर रुपयाच्या घसरणीमुळे परदेशी पर्यटन स्वस्त होऊ शकते, त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. शिवाय, भारतीय निर्यातदारांनाही अधिक नफा मिळेल.
आरबीआय उचलणार ठोस पाऊल?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय रुपयाचे व्यवस्थापन करण्यासाठी पावले उचलू शकते. रुपयाची घसरण म्हणजे सर्वसामान्य जनता आणि सरकार यांच्यातील तणाव वाढणे. कारण, याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होतो.
भारतीय रुपया नीच्चांकी पातळीवर
भारतीय रुपया आता विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 85.84 च्या पातळीवर घसरला आहे. याचा तुमच्यावर मोठा परिणाम होणार आहे.
अधिक वाचा
CrimeNama Live News : विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग.
पुणे शहरात युवतीवर कोयत्याने वार करून खून.
अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर दोन्ही आमदार एकमेकांना भिडले, वाचा सविस्तर.
COMMENTS