प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) जागतिक आदिवासी दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते शंकर घोडे यांन...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
जागतिक आदिवासी दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते शंकर घोडे यांनी जुन्नर तालुका आदिवासी बहुल असून भारत स्वतंत्र झाल्यापासून कृष्णराव मुंढे वगळता आजवर एकाही आदिवासी व्यक्तीला जुन्नर तालुक्याचं प्रतिनिधित्व मिळालं नसल्याची खंत व्यक्त केली. जुन्नर तालुक्यात आमदारकीसाठी इच्छुकांची संख्या जास्त असून आदिवासी समाजाच्या वतीने तिकिटाची मागणी होत असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून नक्की जुन्नर चे तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम जुन्नर तालुक्यामध्ये अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. सभेत बोलताना आदिवासी समाजाच्या वतीने शंकर घोडे यांनी आदिवासी समाजाच्या व्यथा जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व समाजाच्या समोर मांडल्या. पाणी,आरोग्य ,शिक्षण,रस्ते इत्यादी प्रश्नांच्या संदर्भात आदिवासी समाजाची परिस्थिती स्वातंत्र्य मिळाल्या पासून तशीच आहे. १९६२ पासून तब्बल ६४ वर्षे जुन्नर तालुक्याची सत्ता ही इतर समाजाकडे म्हणजे मोठ्या भावाच्या भूमिकेत असणाऱ्या समाजाकडे दिली गेली परंतु लहान भावाच्या भूमिकेत असणाऱ्या आदिवासी समुदायकडे अद्याप लक्ष दिले नाही. १९७८ ते १९८० या दोन वर्षाच्या कालावधीत कृष्णराव मुंढे यांना संधी मिळाली होती. आदिवासी समाज हा नेहमीच आम्हाला केंव्हा तरी संधी मिळेल या आशेवर मतदान करत राहिला. परंतु अद्याप संधी मिळू शकली नाही. आदिवासी समाजाला जर प्रस्थापित समाजाच्या बरोबर मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे असे मत शंकर घोडे यांनी व्यक्त केले. यावर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी आपल्या भाषणात सांगितले की थोड्याफार प्रमाणात आदिवासी समाजाचा विकास होऊ लागला आहे. आदिवासी समाजाची मागणी सहज शक्य होऊ शकते. त्यासाठी आदिवासी समाज एकत्र राहीला पाहिजे. आदिवासी समाजाने एकत्र रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत लहान भावाला सुध्धा विधान सभेची संधी मिळू शकेल असे मत सभेत आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केल्याने विधानसभा जुन्नर चे तिकीट नक्की कोणाला मिळणार हा प्रश्न सर्व सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
चौकट :- आदिवासी समाजातील विविध संघटना व विविध पक्षांचे कार्यकर्ते हे जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकत्र येऊन आदिवासी समाजातील घटकालाच विधानसभेचे तिकीट मिळावे यासाठी आग्रही असून अशी मागणी जोर धरू लागल्याने जुन्नर विधानसभेत कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. जुन्नर तालुक्यातील आदिवासी समाजाची संख्या पाहता जर आदिवासी समाजातील घटकाला विधानसभेचे कोणत्याही पक्षाचे तिकीट जाहीर झाल्यास इच्छुकांची गणिते बिघडतील हे मात्र नक्की.
COMMENTS