पुणे शहरातील येरवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या युवतीवर कोयत्याने हल्ला झाला असून, अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे शुभ...
पुणे शहरातील येरवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या युवतीवर कोयत्याने हल्ला झाला असून, अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे शुभदा कोदारे या युवतीचा मृत्यू झाला आहे.
आरोपी हा तिच्याच कंपनीतील सहकारी असून एका क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
मृत युवती पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर भागात राहण्यास आहे. ती येरवडा येथील नामांकित आयटी कंपनीत कामाला होती. तिच्याच कंपनीत काम करणारा तिचा मित्र कृष्णा सत्यनारायण कनोजा याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभदा कोदारे ही पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीमध्ये अकांऊटंट म्हणून काम करत होती. तिचा सहकारी कृष्णा कनोजा आणि तिच्यामध्ये पैशावरुन वाद सुरू होता. यातूनच आरोपीने हा हल्ला केला. आरोपीने शुभद हिच्या उजव्या कोपऱ्यावर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले. पण अतिरिक्त रक्त स्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून आर्थिक वादातून हे सगळं प्रकरण घडल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशांची देवाण घेवाण झाली होती. मंगळवारी संध्याकाळी शुभदा तिचे काम संपवून पार्किंगमध्ये असलेल्या गाडीतून घरी जात होती. याच वेळी कृष्णा तिथे आला आणि त्याच्या हातात भाजी कापण्यासाठी वापरलेले चोपर होते. त्याने शुभदा हिला अडवले आणि उजव्या हाताच्या कोपऱ्यावर हल्ला केला. हा घाव इतका गंभीर होता की शुभदा तिथेच कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आरोपीने आर्थिक वादातून युवतीवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. आरोपीने कोयता लपवून आणला होता. त्यामुळे कोयता कोणाकडून आणला याची चौकशी सुरू केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS