प्रतिनिधी -प्रा.अनिल निघोट महाळुंगे पडवळ आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावच्या ग्रामदैवत तीन दिवस चाललेल्या यात्रेत ५५० बैलगाडयांस...
प्रतिनिधी -प्रा.अनिल निघोट
महाळुंगे पडवळ
आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावच्या ग्रामदैवत तीन दिवस चाललेल्या यात्रेत ५५० बैलगाडयांसह बैलगाडा मालक शौकिनांचा उदंड प्रतिसाद लाभला. यात्रेस स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्राध्यापक सुरेखाताई अनिल निघोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. प्रत्येक बैलगाडयास चार मिनिटांचा टायमर लावून त्यापुढे वेळ गेल्यास बैलगाडा बक्षीसातुन बाद धरला जात असल्याने शिस्त आणि वेळेत बैलगाडे धावले,टायमर लावण्याचे काम राजुशेठ आवटे तर सेकंद व घड्याळावर अक्षय सोलाट यांनी चोख काम बजावल्याने कौतुकास पात्र ठरले.
आजच्या यात्रेचे विशेष आकर्षण फायनल चे मानकरी राकेश खैरे नारायणगाव,प्रकाश बबन सैद ११.८२ सेकंद,कै.आबाजी होनाजी हिले अवसरी बुद्रुक व पहिलवान जयेश सतीश पोखरकर गंगेवाडी यांचे शंभु व अंजीर हे बैल ११.९१तर नितीन अण्णासाहेब पडवळ १२.०४ सेकंदासह आकर्षण ठरले. तर दिनेश किसनराव लांडगे व मच्छिंद्रशेठ कराळे ११.३२ सेकंदासह घाटाचा राजा ठरले,प्रथम क्रमांकात बाळासाहेब घेवारी,कै.पांडुरंग थोरात भक्ती,जगन्नाथ रामकृष्ण वाबळे,राजुशेठ आवटे,प्रविण पांडुरंग थोरात ,ऊज्वलाताई मनसुख यांनी प्रेक्षकांच्या डोळ्याची प्रकरणं फेडली.
यात्राकमिटी अध्यक्ष अनिल पडवळ,अण्णासाहेब पडवळ,,सचिन पडवळ,यादव चासकर,सोमनाथ पडवळ, नितीन पडवळ, ,दिनकर पडवळ,सुदाम पडवळ,विशाल आवटे,संजय आवटे,विशाल पडवळ,मोहन पडवळ,शंकर पडवळ यांनी यात्रेची चोख व्यवस्था पाहिली.
अनाउंसर म्हणून प्रसिद्ध प्रदिप भोर,नवनाथ वाळुंज, मधुकर जाधव,स्वप्नील टेमगीरे,राहुल भाईक,रुषी देवडे,उमेश भापेकर यांनी आपल्या पहाडी आवाजात समालोचन करुन बैलगाडा रसिकांची मने जिंकली.
COMMENTS