बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणामुळे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. य...
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणामुळे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यातच विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
तर मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडे राजकीय हालचाल करतांना दिसत आहेत. यावरूनत आता शरद पवार आणि अजित पवार गटातील दोन्ही आमदारांमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर धनंजय मुंडेनी प्रफुल्ल पटेल आणि आणि सुनील तटकरे यांच्यासोबतही त्यांनी संपर्क साधला. यावरूनच आता जो स्वत: च्या काकाचा मान ठेवत नाही, तो जनतेचा काय मान ठेवली ? मराठा नावाला कलंक. स्वयंघोषित दादा असे म्हणत शरद पवार गटातील आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यावर आता अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कशाला अक्कल पाजळतोस? तुझ्या वडिलांबद्दल तुझी वागणूक अख्ख्या देशाने बघितली आहे. तु तर मानव जातीला कलंक आहेस. आपली लायकी पाहुन वागत जा. मराठा व इतर सर्व बहुजन समाजात आईवडील श्रेष्ठ मानल्या जातात. तु नेता व्हायच्या लायकीचा आहेस का ? आरशात बघ जरा. कलंक्या. अशी खोचक टिप्पणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्याकडे तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे का ? यावर विचारले असता धनजंय मुंडे यांनी आपण कोणताही राजीनामा दिला नाही. अशी प्रतिक्रिया मुंडेंनी दिली आहे. त्यामुळे बीड प्रकरणात धनजंय मुंडेंना तुर्तास तरी अभय दिल्याचं समजत आहे.
कशाला अक्कल पाजळतोस? तुझ्या वडिलांबद्दल तुझी वागणूक अख्ख्या देशाने बघीतली आहे. तु तर मानव जातीला कलंक आहेस.आपली लायकी पाहुन वागत जा. मराठा व इतर सर्व बहुजन समाजात आईवडील श्रेष्ठ मानल्या जातात.तु नेता व्हायच्या लायकीचा आहेस का आरशात बघ जरा
COMMENTS