कोलठाण : जनसेवा शिक्षण मंडळ संचलित नुतन विद्यालय कोलठण शाळेत *चला परिक्षेला आनंदाने सामोरे जाऊ या* या उपक्रमांतर्गत साहित्यिक, व्याख्याते ,...
कोलठाण : जनसेवा शिक्षण मंडळ संचलित नुतन विद्यालय कोलठण शाळेत *चला परिक्षेला आनंदाने सामोरे जाऊ या* या उपक्रमांतर्गत साहित्यिक, व्याख्याते , संपादक प्रा. नागेश हुलवळे यांचे इंग्रजी विषयाचे व्याख्यान संपन्न झाले .
प्रा. नागेश हुलवळे यांनी आपल्या व्याख्यानात अनेक मौलिक बाबींवर प्रकाश टाकला. त्यात त्यांनी पुढील काही महत्त्वपूर्ण बाबी नमूद केल्या....
परीक्षा ही खरंच एक आनंदाची पर्वणीच आहे, कारण ती केवळ आपल्याला आपले ज्ञान तपासण्याची संधी देतेच, पण स्वतःवर विश्वास वाढवण्याची आणि स्वतःला अधिक चांगले सिद्ध करण्याची प्रेरणाही देते. परीक्षेच्या काळात मेहनत, शिस्त, आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचं महत्त्व अधोरेखित होतं. ज्या प्रमाणे आपण सणोत्सव साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी परिक्षेची तयारी करायला हवी . असे ते म्हणाले . त्यामुळे परिक्षेची भीती मनातून कमी होते आणि ताण-तणावाऐवजी आत्मविश्वास आणि शिकण्याची उत्सुकता वाढते. इंग्रजीचा अभ्यास कसा करावा यासंबंधी काही मार्गदर्शक टिप्स त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या ..
🔷 इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांचा कल इंग्रजीचे शब्दभांडार वाढवण्याकडे असला पाहिजे.
🔷शब्दांचा अभ्यास शब्दांच्या प्रकारानुसार केला पाहिजे म्हणजे पुढे वाक्यांचा अभ्यास करताना शब्द अभ्यास अधिक फायद्याचा होईल.
🔷शब्द प्रकार म्हणजे शब्दांच्या जाती जसे की नाम (Noun),सर्वनाम(Pronoun), क्रियापद( verb), इत्यादी.
🔷शब्दभांडार वाढवण्यासाठी शब्दकोशाचा (Dictionary)संदर्भ सतत घेतला पाहिजे. Dictionary मध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ प्रकार व उपयोग याविषयी अचूक मार्गदर्शन केले असते.
🔷शब्दभांडार वाढवण्यासाठी इतर विषयांचे शब्ददेखील अर्थासह आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
🔷शब्दानंतर वाक्यरचनांचा अभ्यास करावा. त्यामध्ये वाक्यांचे प्रकार व व्याक्यातून व्यक्त होणारा अर्थ तसेच दोन वाक्य कशी जोडावी त्यासाठीचे जोडशब्द योग्यप्रकारे कसे घ्यावे त्याचा अभ्यास करावा.
🔷व्याकरणाचा अभ्यास साधारणतः चढत्या क्रमाने करावा….
i ) सर्वप्रथम वर्णमाला अभ्यासावी.
ii)त्यानंतर शब्द अर्थासह अभ्यासावे.
iii) त्यानंतर वाक्य प्रकारासह वाक्यांचा अभ्यास करावा.
iv)त्यानंतर वाक्य बदलाचा सराव करावा.
v) वाक्य बदलाच्या सरावासाठी व्याकरणातील विविध घटकांचा अभ्यास करावा . उदा: change the tense, direct into indirect, change the voice, degrees of comparison, simple, compound,complex etc.
v) परिच्छेद लेखन करताना वाक्यांचा योग्य पद्धतीने उपयोग करावा. त्यामध्ये Letter writing ( पत्रलेखन ), Report writing (अहवाल लेखन),Speech writing (भाषण लेखन ) Dialogue writing (संवाद लेखन ) इत्यादी
🔷इंग्रजी मध्ये वाक्य बनवण्यासाठी व वाचत असलेल्या वाक्यांचा अर्थ समजण्यासाठी काळ (Tense) हा घटक अतिशय बारकाईने अभ्यासणे गरजेचे आहे.
🔷व्याकरणातील वेगळ्या वाक्यरचनांचा अभ्यास करावा. त्यांचे नियम पाठ करावेत.उदाहरणार्थ to be going to, to be able to, to be unable to, used to , remove- too,add a question tag, voice, degree, narration, synthesis इत्यादी.
Synthesis म्हणजे दोन किंवा अधिक वाक्य एकत्र जोडणे. not only….but also, neither...nor, no sooner ….. than, as soon as, as well as , इत्यादी घटकांचा अभ्यास करावा त्याचे नियम व अर्थ समजून घ्यावेत.
🔷ज्यावेळेस आपल्याला एखाद्या विषयावर लेखन करावयाचे आहे त्यावेळेस वरील जोड शब्दांचा चपखलपणे उपयोग करावा.
🔷परिक्षेत आपल्याला खालीलप्रकारे लेखन करावयाचे आहे.
i) Letter writing
ii) Dialogue writing
iii) Speech writing
iv) Information Transfer
v) News Report
vi) Developing story
vii) Summary writing
वरील लेखनकौशल्यातील घटकांचा दररोज एक अथवा दोन याप्रमाणे नियमित सराव करावा.
🔷आपला परिच्छेद व लेखन कौशल्य अधिक सुंदर, वाचनीय, रंजक करण्यासाठी त्यामध्ये प्रसंगानुसार अर्थानुसार Proverb, good thoughts, phrases, figures of speech, quotations यांचा चपखलपणे वापर केला पाहिजे.
🔷व्याकरणाचा नियमित सराव करावा व त्यासाठी आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळवावे .
पाठ्यपुस्तका सह अवांतर वाचन होणे अतिशय आवश्यक आहे.
🔷धड्याखालील कृतींचा बारकाईने सराव करावा. ह्याच कृतीवर परिक्षेतील कृतीपत्रिका आधारित असते.
🔷कोणत्याही विषयाचा अभ्यास भाषा समृद्धीला पूरक असतो. हे सूत्र लक्षात ठेवा.
चिंतन म्हणजे विचार करणे या कृतीतून आपण आपल्या भावना अथवा विचारांना शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करतो. म्हणजेच विचारांचे भाषांतर करणे आवश्यक आहे ते कसं करावं हे शिकून घ्या
🔷सर्वात महत्त्वाचे भाषेची चार कौशल्य असतात.
१) श्रवण कौशल्य(Listening skills),
२)भाषण कौशल्य(speaking skills),
३)वाचन कौशल्य(reading skills),
४)लेखन कौशल्य(writing skills)
या कौशल्यांना विद्यार्थ्यांनी किती आत्मसात केले आहे.हे तपासण्यासाठी(evaluation) परीक्षा असते म्हणून चारही कौशल्य पक्की आत्मसात करावी.
तसेच त्यांनी परिक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बाबी सांगितल्या .
1. योग्य तयारी: अभ्यासाचा योग्य नियोजन आणि नियमित सराव तुमचा आत्मविश्वास वाढवतो.
2. सकारात्मक दृष्टिकोन: परीक्षा म्हणजे शिक्षा नाही; ती तुमच्या क्षमतेचा उत्सव आहे, हे लक्षात ठेवा.
3. आरोग्याकडे लक्ष द्या: योग्य आहार, झोप, आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा व्यायाम करा.
4. स्वतःवर विश्वास ठेवा: चुकांमधून शिकणं आणि पुढे जाणं, हाच खरा प्रगतीचा मार्ग आहे.
5. मोबाईलचे व टीव्हीचे दुष्परिणाम.
परीक्षा ही एका पर्वणीप्रमाणे साजरी केल्यास ती केवळ शैक्षणिक उद्दिष्टांसाठीच नव्हे, तर आयुष्यभरासाठी उपयोगी ठरेल!
अभ्यासा व्यतिरिक्त संस्काराचे धडे देताना, अनेक गंभीर विषयाला हात घालताना त्यांनी आपल्या खुमासदार विनोदशैलीने मुलांना मनमुराद हसवताना मुलांना तणावमुक्त केले .
कोलठण परिसरातील लोकप्रिय कवी आणि नूतन विद्यालयाचे एक पालक मा. जयराम कराळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मा. जानु वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली
सहशिक्षक मा. राजेंद्र यशंवत , मा. रविंद्र लाटे , मा . मिलिंद पवार , मा. संभाजी काळे , मा. माधुरी बोस्टे , मा. नयना रसाळ , मा. एकनाथ सपाटे , मा. गणेश पवार , मा. सुभाष पठारे , मा. विलास देशमुख यांनी खूप परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेचे सहशिक्षक मिलिंद पवार यांनी केले .
COMMENTS