प्रतिनिधी प्रा अनिल निघोट मंचर दि १७ फेब्रुवारी आज पहाटे साडेपाच वाजता नाशिक बाजुकडून येणाऱ्या मारुती स्विफ्ट कार mh14 dt 0295 ने मंचर अवस...
प्रतिनिधी प्रा अनिल निघोट
मंचर दि १७ फेब्रुवारी
आज पहाटे साडेपाच वाजता नाशिक बाजुकडून येणाऱ्या मारुती स्विफ्ट कार mh14 dt 0295 ने मंचर अवसरी फाटा येथील पेठ घाटाच्या सुरुवातीलाच गोरक्षनाथ मंदिरासमोरील महामार्गावरुन खेड ला जात असता पुण्याकडुन येणाऱ्या ट्रक mh12 qg 3351 ने डिव्हायडर ला धडक देऊन दुसऱ्या बाजूच्या कारला उडवल्याने कारमधील तिघे ठार झाले अंकुश भांबुरे,विरेंद्र कदम रोहित राक्षे सर्व खेड हे मयत झाले.
तर कारचा जळुन कोळसा झाला,कार व ट्रक ड्रायव्हर जखमी झाले,याच नियंत्रण सुटलेल्या ट्रकने बंद पडलेल्या कंटेनर ला जोरात धडक दिल्याने कंटेनर pb 10 gk 5315 मध्ये झोपलेले दोन ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले.,आज सकाळी अपघातग्रस्त वाहने पोलिस व नागरिकांनी क्रेन च्या मदतीने हलवल्याने वहातुक कोंडी कमी झाली यात आळेफाटा महामार्ग प्रभारी अधिकारी पोलिस ऊपनिरीक्षक निरीक्षक अशोक पिंपळे, मंचर पोलिस स्टेशन चे ऊपनिरीक्षक सोमशेखर शेटे, ठाणे अंमलदार राजेंद्र हिले, अढारी, संजय नाडेकर,कान्स्टेबल योगेश रोडे, संजय नलावडे तसेच रुग्णवाहिकाचालक स्वप्निल मोरे,गौरव बारणे,अमित काटे, गणेश शिंदे यांनी अपघातस्थळी मदत केली.
COMMENTS