आपटाळे बीटस्तरीय स्पर्धा मोठ्या उत्साहात उच्छील येथे संपन्न. | CrimeNama
Loading ...

आपटाळे बीटस्तरीय स्पर्धा मोठ्या उत्साहात उच्छील येथे संपन्न.

प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी आपटाळे बीटस्तरीय यशवंतराव चव्हाण कला- क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत...



प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )

दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी आपटाळे बीटस्तरीय यशवंतराव चव्हाण कला- क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथे संपन्न झाला.या बीटस्तरीय महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन आपटाळे बीटच्या विस्तार अधिकारी सौ संचिता अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख पुष्पलता पानसरे यांनी केले. केंद्रप्रमुख सुरेश भवारी, संतोष चिलप, मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी या नियोजनानुसार संपूर्ण कामकाज पाहिले. सूत्रसंचालन सुभाष मोहरे यांनी केले.



उद्घाटनप्रसंगी उच्छिल ग्रुप ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मंगेश आढारी,  उपसरपंच मारुती खिलारी, पोलीस पाटील सुनिल बगाड , व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन नवले, उपाध्यक्ष सागर बगाड, हनुमान दुध संस्थेचे चेअरमन बबनशेठ नवले, पुणे जिल्हा नाभिक संघटनेचे अध्यक्ष आत्माराम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बजरंग आढारी, सदस्य पांडूरंग भालेराव सौ.सविता आढारी, तंटामुक्ती मा. अध्यक्ष हरिभाऊ शिंदे, मा. चेअरमन सुदाम नवले, मा. अध्यक्ष दत्तात्रय भालेराव, जगदिश नवले, संचालक बापू नवले,गुलाब आढारी, पालक शिवाजी नवले, अशोक भालेराव, महेश शिंदे, रामदास बाबाजी नवले जयराम नवले पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष बाळासाहेब लांघी, गुणलेखन सचिन नांगरे, शिक्षक नेते भरत बोचरे उपस्थित होते.तसेच बीटमधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा व बक्षीसे देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. आशाताई बुचके, मा.अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे देवरामशेठ लांडे, पुणे जिल्हा दूध संघाचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब देवाडे, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीपशेठ गांजाळे, खामगाव गावचे मा उपसरपंच अजिंक्य घोलप, संदिपभाऊ मुंढे आदी परिसरातील विविध गावचे लोकनियुक्त सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

 बक्षिस वितरण प्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत गरीबे व गटशिक्षण अधिकारी सौ.अनिता शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली. विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह, मेडल, पेन आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

या कार्यक्रमाचे नियोजनात उच्छिल शाळेच्या शिक्षिका सौ स्मिता ढोबळे, आरती मोहरे, लिलावती नांगरे तसेच उच्छील केंद्रातील सर्वच शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम  घेतले.  पंच म्हणून आंबोली विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वाघ बाळासाहेब जाधव, सुष्मा भांगे, विठ्ठल जोशी काकडे सर ढमाळे सर, आपटाळे देवाडे सर, राणे सर यांनी मैदानी स्पर्धा पार पाडल्या. स्पर्धेसाठी विशेष सहकार्य बाळासाहेब कडू सागर भवारी तुळशीराम साबळे पूनम तांबे तुकाराम भालेकर शोभा उंडे बाळासाहेब करवंदे यांचे लाभले  उर्वरीत सर्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून बीट मधील सर्व शिक्षक बांधव यांनी कामकाज पाहिले.स्वंयसेवक म्हणून आंबोली विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी नियोजनात मदत केली. सर्व स्पर्धक, शिक्षक, पालक, मान्यवर यांना उच्छिल केंद्राच्या वतीने चहापाणी व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ तसेच केंद्रप्रमुख मॅडम यांचा आर्थिक सहभाग होता. मान्यवरांचा सत्कार अन्वर सय्यद यांनी केला. सुभाष मोहरे यांनी सर्वांचे आभार मानले. स्पर्धा अतिशय उत्साहवर्धक वातावरणात व पारदर्शक पद्धतीने संपन्न झाल्या.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2193,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,401,India,222,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,187,Maharashtra,791,Mumbai,177,Nagpur,18,Nashik,27,Politics,211,Pune,1298,Raigad,13,Ratnagiri,12,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,21,World,53,
ltr
item
CrimeNama: आपटाळे बीटस्तरीय स्पर्धा मोठ्या उत्साहात उच्छील येथे संपन्न.
आपटाळे बीटस्तरीय स्पर्धा मोठ्या उत्साहात उच्छील येथे संपन्न.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg00lJ_wfTT9p83zS77YYvTRg_sHLa0QgTGuSCHHS9hheuempdYeUBHodlv0GDuzcehyphenhyphenpyN3jI4OvM29gT1WzG1n8EE1qJb6UDRyyJZXrLEx2_szRXErTmdrD3PAtWn0bTsiv5lFV51sSGRLQfchVcyhbBZHdMqkRiYfTAq8EhamoTVrgDR6sqoXJ3JCx0/s320/IMG-20231215-WA0075.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg00lJ_wfTT9p83zS77YYvTRg_sHLa0QgTGuSCHHS9hheuempdYeUBHodlv0GDuzcehyphenhyphenpyN3jI4OvM29gT1WzG1n8EE1qJb6UDRyyJZXrLEx2_szRXErTmdrD3PAtWn0bTsiv5lFV51sSGRLQfchVcyhbBZHdMqkRiYfTAq8EhamoTVrgDR6sqoXJ3JCx0/s72-c/IMG-20231215-WA0075.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2023/12/blog-post_4.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2023/12/blog-post_4.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content