नारायणराव दि.५जुन प्रतिनिधी प्रा अनिल निघोट सर खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या मनाचा मोठेपणा! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैन...
नारायणराव दि.५जुन
प्रतिनिधी प्रा अनिल निघोट सर
खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या मनाचा मोठेपणा! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी विजयासाठी जे जीवापाड कष्ट केले, घरोघरी प्रचार चिन्ह पोहोचविले,महाविकास आघाडी जनहित लक्षात घेते ,तर कपटि कारस्थानी फसवनीस गोदी ना च्या भाजपनं महागाई, बेरोजगारी,पाडलेले शेतमाल दुधाचे भाव यापेक्षा राम , बजरंग बली चं नाव घेत प्रचारात उतरले,पण ईडी सीबीआय चौकशी धाडी जेल जप्ती ची भीती दाखवून फोडलेले गददार भ्रष्टवादी स्वतःच्या मतलबासाठी भोळ्या भाबड्या शिवसैनिकांच्या बळावर सगळं मिळवून, कमवुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच उलटले, मतदारांचा विश्वासघात केला.त्यांच्याविरोधात शिवसैनिक ऊद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने प्राणपणाने लढले,आणि खोकेबहादरांना, प्रत्येक बाबींसाठी पैसे फेकून सगळ्यांना विकत घेणारांना, मग्रूर, अहंकारी,बघतो कसा निवडून येतो ? च्या धमक्या देणाऱ्यांना जनतेनं पार कचराकुंडीत फेकून दिले. शिवसैनिकांचा गद्दारांविरोधातला राग,जोश यातुन घराघरातील शिवसैनिक बाहेर पडला व दलबदलुंना जन्माचा धडा शिकवुनच शांत बसला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रा सुरेखाताई निघोट, लांडेवाडी गावचे मा सरपंच, शाखाप्रमुख बाळासाहेब निसाळ, कळंब घ्या सरपंच कानडे, मा सरपंच भालेराव शिवसैनिक, महिला आघाडीच्या रणरागिणींनी विरोधकांना पळता भुई थोडी करून दिड लाखावर मतांनी निवडून आणल्याबद्दल डॉ अमोल कोल्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांचे आभार मानुन सत्कार करायला नारायणगाव येथील खासदारांच्या संपर्क कार्यालयात गेल्या असता,त्यांचाच धडाडीने प्रचार करुन यश मिळवल्याबद्दल सन्मान करुन आपल्या ऊमदया स्वभावाची व कृतज्ञ व्रुती चे दर्शन घडविले.
ज्यांना दिवसरात्र, जीवापाड मेहनत करून चार चार वेळा घर कुटुंबाचा विचार न करता शिवसेनेचा भगवा फडकवायचाच या निर्धाराने भगवा फडकवणारे शिवसैनिकांनाच, तुम्ही कट्टर शिवसैनिक काय,मला माहितीय कीती कट्टर म्हणून हिनवुन अपमानित करणारे, शिवसैनिकापेक्षा लाभार्थी,खुषमस्करे सांगतील तीच कामं करून शिवसैनिकांच्या तोंडाला पानं पुसणारे, अनेक शिवसैनिकाना निवडणूकीत मदत न करुन पाडणारे, अनेक पदाधिकारींना कटकारस्थान करून खाली खेचणारे, हलक्या कानाचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ऊद्धव जी ठाकरे यांनी सगळं देऊन ऊलटणारे, शिवसेनेचा स्वतःची खाजगी सेना म्हणुन वापर करणारे, भ्रष्टावादीच्या नावानं गळे काढणारे आता टप्प्यात आल्यावर जीवाचे रान करून शिवसैनिकांनी सभ्य, सुसंस्कृत डॉ अमोल कोल्हे सध्यातरी एक चांगला माणूस, ऊद्धव जी ठाकरेंच्या आदेशाने निवडून आणला, त्यांचं केलेलं कौतुक ऐकून शिवसैनिक समाधान पावले. अन् येत्या विधानसभेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी कोणत्याही शिवसैनिकावर विश्वास टाकून मशाल चिन्हावर संधी दिल्यास भगवा फडकवणारच असा आत्मविश्वास व्यक्त केला.
COMMENTS