मंचर दि.२ जुन मंचर येथील बी एड कॉलेज मध्ये झेड एम शेख अध्यापक विद्यालयात २००६ ते २००८ म्हणजे सतरा वर्षापुर्वी डी.एड केलेल्या व सध्या शिक्षक,...
मंचर दि.२ जुन
मंचर येथील बी एड कॉलेज मध्ये झेड एम शेख अध्यापक विद्यालयात २००६ ते २००८ म्हणजे सतरा वर्षापुर्वी डी.एड केलेल्या व सध्या शिक्षक, व्यावसायिक, कॉन्टॅक्टर, संस्थापक, क्लासचालक अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर म्हणजे परत एक दिवस शाळा भरली.
एकमेकांच्या सोबतच्या आणि एवढया वर्षानंतरचे सुखदुःखाचे क्षण एकमेकांना सांगत मैत्री टिकवून ठेवायची ग्वाही सर्वांनी दिली.याप्रसंगी तत्कालीन शिक्षक प्रशिक्षक डाएट चे प्राचार्य डॉ बाळकृष्ण वाटेकर,डॉ कैलास दौंडकर, टाकसाळे सर, विशाल डुंबरे सर,असीर शेख सर , रमेश गुजर,अन्वर पठाण सर, गंगाराम तनपुरे,प्रा. अनिल निघोट सरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आपल्या गुरुजनांचा सन्मान केल्याबद्दल आभार मानुन महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुन्नी जुम्मा एज्युकेशन सोसायटी, मंचर चे सचिव शाहिदभाई शेख, संचालक मन्सूर पठाण, रजिस्टार अब्दुल गनी सर यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले यानंतर स्नेहभोजन व संमेलन मोरया हॉटेल येथे पार पडले. कार्यक्रमात देवडे सर, प्रमोद पडवळ सर ,गजानन जाधव , प्रा.सुरेखा निघोट,सपना निघोट,मगर, हरेश्र्वर , नितीन भोसले, समीर लफडे, गफले मंदार चव्हाण,यांनी आठवणी जागवल्या.
सुत्रसंचलन अमित थोरात , रविंद्र गावडे यांनी तर आभार राज पाटील मानले.
COMMENTS