एसटी महामंडळाला (ST Mahamandal) पुढील पाच वर्षांत 25 हजार नवीन बसेस (New Buses) मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित प...
एसटी महामंडळाला (ST Mahamandal) पुढील पाच वर्षांत 25 हजार नवीन बसेस (New Buses) मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली असून, तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना परिवहन विभागाला (Transport Department) दिल्या आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ही माहिती दिली.
राज्याच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पासाठी (Budget) परिवहन विभागाची आढावा बैठक सोमवारी अजित पवार यांनी बोलावली होती. या बैठकीत एसटीच्या सद्यःस्थितीची माहिती मंत्री सरनाईक यांनी सादर केली.
सध्या एसटी महामंडळाकडे केवळ 14 हजार 300 बसेस आहेत. त्यात 10 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या 10 हजार बसेस आहेत. या बसेस पुढील 3-4 वर्षांत प्रवासी सेवेतून बाद होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
ही वस्तुस्थिती लक्षात घेता, दरवर्षी 5 हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 25 हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना (Five Year Plan) आखण्यात आली आहे. या योजनेला अर्थमंत्र्यांनी (Finance Minister) परवानगी द्यावी, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. ही निकड लक्षात घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
या निर्णयामुळे, एसटी महामंडळाच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात नवीन बसेस दाखल होणार असून, प्रवाशांना अधिक चांगली आणि आरामदायी सेवा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, जुन्या बसेसमुळे होणारे प्रदूषणही (Pollution) कमी होण्यास मदत होईल.
अधिक वाचा
भारतीय संविधानाची यशस्वी वाटचाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी
सोशल मिडियाचा शिक्षणावरील परिणाम- लेखक प्रा. अनिल नारायण निघोट
COMMENTS