घटना समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना स्वीकृती केली. समारोपाच्या भाषणात घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकरा...
घटना समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना स्वीकृती केली. समारोपाच्या भाषणात घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करताना म्हणाले 'मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता ते काम तडीस नेले आहे. घटना तयार करण्याच्या मसुदा समितीवर डॉ. आंबेडकरांची निवड करण्यात आली हा जो निर्णय घेतला, त्याच्या इतका अचूक निर्णय घटना समितीने दुसरा कोणताही घेतला नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या निवडीची यथार्थता पटवून दिली, इतकेच नव्हे तर त्यांनी जे कार्य केले, त्याला त्यांनी एक प्रकारचा तेजस्वीपणा आणला. सभागृहात अभिनंदनासाठी टाळ्यांचा कडकडाट होत होता.....परंतु या टाळ्यांच्या कडकडाटीच्या मागे मागे आणि खूप मागे पाहताना मला दिसत आहेत ते लहान बाबासाहेब तेज, ताडपदार, तरतरीत, तेजपुंज, चेहरा आणि भविष्याचा वेध घेणारे, बोलक्या डोळ्यांचे, भिमराव रामजी आंबेडकर. तत्कालीन सामाजिक विषमता भयाण होती, जातीय, धार्मिक, अंध्रश्रद्धा, आणि जातींची उतरंड होती. तर दुसरीकडे देव सर्वत्र आहे. जळी , स्थळी, पाषाणी आहे. देव झाडाझुडपात, प्राणी, पक्षांत, कुत्र्या मांजरातही होते. पण फक्त अस्पृश्य, दलित, वंचित, बहुजनात मात्र कुठेही दिसत नव्हता. किंबहुना या सर्व "वंचित " गटांनी देवालाही पाहू नये अशी व्यवस्था होती. तेहत्तीस कोटी देवांपैकी एकही यांच्या साठी नव्हता. गावाबाहेर ठेवलेल्या महारवाडा, चांभार, वडार,...... वसति प्रमाणे यांचा 'देव' ही वेशी बाहेर शेंदूर फासून मोरोबा , म्हसोबा ,.... वेशी बाहेरच होते.एकीकडे सर्वजण 'हरीचीच लेकरे म्हणणारी, जखम मांडीला असताना औषध शेंडीला लोवणारे प्रतिष्ठित समाजातील लोक..... कुत्र्यांच्या भाकरीला तूप लावणारे ..... 'अस्पृश्य' म्हणून पाण्याच्या विहिरी तलावांनाही हात लावू न देणारे, गळ्यात मडकं, कमरेला झाडू बांधायला लावलेल्या लोकांत स्वतःच एक स्वतंत्र "अस्थित्व" बनवून स्वतःचा, स्वतःच्या घराण्याचा, स्वतःच्या समाजाचा, स्वतःच्या समाजासोबत समस्त "मानवकल्याणाचा" उद्धार करणारा.... खरा मसिहा.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उभा जन्म माणुसकीचा महामेरू उभारण्यात गेला. एक अस्पृश्य घरात जन्मलेला मुलगा ते भारतीय संविधानाचा निर्माता हा प्रवास संपूर्ण जगाला अचंबित करणारा आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या देशात शेकडो परकीयांच्या आक्रमणाने, सत्तेने खिखिळीत झालेले देश अशा परिस्थितीत दलित, वंचित, बहुजन, महिलाच नव्हे तर संपूर्ण 'भारतीय माणसाच जगणं आणि त्यांच जीवनमान बदलून स्वतंत्र भारताचे पहिले संविधान लिहून भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगात 'लोशाहीचे जनक' म्हणून स्वतःचीच स्वतःच्या ज्ञानावर मिळवलेला बहुमान म्हणजेच "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" !!
• विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर: अमेरिका हा जगातील महासत्ता असणारा देश, त्यांनी अमेरिकेत "स्ट्याच्यु ऑफ इक्वालिटी" हे नाव देऊन समतेचे प्रतीक म्हणून गौरवले आहे असे एकमेव उदाहरण आहे.
• अमेरिकेतील नूयोर्क ते कॅनडातील यॉर्क विद्यापीठात बा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाचा प्रभाव दिसतो तर अठराव्या शतकात स्थापन झालेल्या ऑस्ट्रोलयातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून मान्यता असणारे "मेलबर्न" विद्यापीठातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धकृती पुतळा स्फुर्तीदायक आहे.
• ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकायला गेले त्याचं विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आत्मकथा त्यांच्या अभ्याक्रमात समाविष्ट केला आणि ज्ञानाचे उपासक, ज्ञानी, बाबासाहेब नवीन पिढीला खऱ्या अर्थाने समृद्ध करतात.
• लंडनच्या 'ग्रेज इन' हे एक भव्य दालन असून त्या दालनात एकमेव भारतीयांचे तैलचित्र लावून सन्मान करण्यात आले ते म्हणजे घटना तज्ञ, न्याय तज्ञ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
• हंगेरीत रोमा हा लोक समुदाय आढळतो जो मूळचा भारतीय वंशज असल्याचे सांगितले जाते, यांनाच तेथे 'जिप्सी' असेही संबोधतात; यांच्यावर स्थानिकांचा अन्याय, अत्याचार होता, क्रिस्टोफ जोफ्रेलोट या समाज- सुधारकाने रोमानी भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी लिखाण केले आणि हंगेरीयातील एक मोठा समुदाय "दलितीचा उद्धारक " माणूसकीचा महामेरु, समाजप्रवर्तक म्हणून "जयभीम आणि बौद्ध धर्माशी" जोडले गेले; हंगेरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे शाळा आणि अर्धपुतळा उभारण्यात आला.... यावरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर का ठरतात ? याचे उत्तर मिळेल
• प्रज्ञा सूर्य, ज्ञानसूर्य, क्रांतीसूर्य का म्हणतात? याच्या अनेक उत्तरापैकी एक उत्तर म्हणजे जगात उगवत्या सूर्याचा देश हणून ओळखला जाणारा देश म्हणजे जपान... आणि बौद्ध संस्कृती आचरणारा देश... अणुबॉम्ब हल्यात बेचिराग झालेला देश... युद्ध नको बुद्ध हवा म्हणणारा देश... कोयासन विदयापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्यांनी संपूर्ण देशाला हा संदेश दिला की ... " डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे नाहीत .... माणसांच्या कष्ट, संकट, यातना, जातीयता, अंधविश्वास याच्यातून बाहेर काढणार "प्रेरणास्थान" आहे.
• संविधानाचे कार्य २ वर्षे ११ महिने १८ दिवस अहोरात्र चालत होते. या सातत्याने चालणाऱ्या कार्यात आरोग्याची हेळसांड झाली. बसून बसून पोटाखाली जखम झाली, मधूमेह वाढाला, लाकडी खुर्चीही वेदनादायक ठरेल इतके शरीर नाजूक झाले, त्यासाठी विशेष फोमची खुर्ची बनवून घेण्यात आली.... परंतु हातातली लेखणी मात्र काही थांबली नाही... ज्या हातात पाटी पेन्सिल घेण्यासही मज्जाव केला गेला आणि वर्गाच्या बाहेर बसवण्यात आले, त्याच भीमरावांसाठी " संविधान सभेत" विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली...आणि हे यश होत त्या प्रतिकूल परिस्थितीच्या शेष नागाच्या फणीवर बसलेल्या भीमरावांच...
• हे यश होत त्या भीमाई आधि रामजीच्या संस्कारच...
• हे यश होत. करोडो व्याकुळ नजरेच...
• हे यश होतं मुक्तीसाठी साखळदंड तोडू पाहणाऱ्या करोडो माता भगिनींच
• हे यश होतं ज्ञानाच्या अश्वमेध रथावर स्वार होऊन 'निळा चक्र" फिरवणाऱ्या योध्याचं अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच...
संविधानाचा गाभा:
स्वातंत्र्य, बंधूता, न्याय, समता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रहित, मानवीमूल्य जपणारा, राजारंक एक हक्क, अधिकार देणारा, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा,व उपासनान्वये स्वतंत्र देणाराआणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क संविधानाच्या माध्यमातून भारताला दिले. या भारतीय संविधानाची प्रास्तविक म्हणजेच "मानव मुक्तीचा जाहिरनामा" आहे असे जगदीश ओहोळ म्हणतात.
भारतीय संविधानाचे महत्व:
हे भारताचे संविधान जात, धर्म, पंथ, वर्ण , भाषा, अशा अनेक विविधतेचा संपूर्ण विचार करून "सर्वसमावेशक संविधान" आहे. संविधानामुळे भारतातील प्रत्येक मताला एकच मोल आहे. कोणत्याही व्यक्तीची स्त्री पुरूष वा जात धर्म म्हणून वेगळे मोल ठेवले नाही. सर्वांनाच समान अधिकार दिला आहे.
• या संविधानाचा अभ्यास करण्याचा, समीक्षण करण्याचा, संविधानात सुधारणा करण्याचा, (बहूसंख्य संख्या असल्यास) अधिकार दिला आहे.
• संविधानाच्या माध्यमातून 'लोकशाही' मार्गाने स्वतःची प्रगती साधण्याचा अधिकार दिला आहे.
• मूलभूत कर्तव्यावरही लक्ष केंद्रीत करते.
• लोकांद्वारे, लोकांसाठी चालणारी राज्यघटना आहे.
• सार्वभौम, प्रजासत्ताक शासन प्रणाली, लवचिक प्रणाली स्वीकारली आहे आणि हा संविधानाचा कणा आहे.
संविधान आणि तरूणाईची जबाबदारी:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली भारतीय घटनेची मीमांसा यात शेवटी समारोपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रिटीश राजकीय तत्ववेत्ता बर्फ याच्या एका वाक्याने शेवट करतात, ते म्हणजे “सत्ता देणे सोपे आहे, परंतु शहाणपण देणे अवघड आहे! आपण आपल्या कृतीने हे दाखवून देऊया की घटना समितीस सार्वभौम सत्ता असली तरी ती सत्ता तिने शहाणपणाने वापरली आहे... देशाचे ऐक्य राखणारा दूसरा मार्ग नाही आणि याबद्दल माझ्या मनात शंका असण्याचे कारण नाही (१७ डिसेंबर १९४६) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या भाषणातही अशा पद्धतीने “संविधानाची संवेधनशिलपणे सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे.
त्यामुळे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवात संविधानाचीभूमिका ही अधिक मोलाची आहे. इतिहास उगाळायचे नसले तरी त्याचा बोध घेऊन भविष्याचे वेध घेण्यासाठी तरूणाईनी संविधान वाचली पाहिजे... वाचवली पाहिजे’
जयभीम!!!
प्रा. डॉ.गिता शिंदे विभागप्रमुख, शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
COMMENTS