Ajit Pawar | पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे आज पहिल्यांदाच बीडमध्ये गेले आहेत. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातही त्यां...
Ajit Pawar | पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे आज पहिल्यांदाच बीडमध्ये गेले आहेत. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातही त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी पक्षात चुकीचं काम करणाऱ्या लोकांना ठेवणार नाही असं म्हणत सज्जड दम दिलेला पाहायला मिळालं.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यात वातावरण ढवळून निघालं. कमरेला कट्टे लावून फिरणारे, हवेळ गोळीबार करणारे, धमकावणारे बीडचे अनेक भाईगिरी करणारे राजकीय कार्यकर्ते राज्याने पाहिले. त्यामुळे याच सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजित पवार यांच्यासमोर आवाहन असणार आहे.
पॉलिटिक्स : धनंजय मुंडेनी मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी ठेवली "हि" अट!
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा देत सांगितलं की, बीड जिल्ह्यात कारखान्यांच्या व्यवस्थापकाला खंडणी मागितली जाते. हे योग्य नाही, जर कोणी खंडणी मागितली तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. मी पोलिसांना सर्वात कठोर शिक्षा देण्याची विनंती करेन, असं अजित पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बैठकीत सांगितलं.
अजित पवार पुढे म्हणाले की, अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणी खोटं बोलेल, कोणी काहीही बोलेल यावर विश्वास ठेवू नका. विकासकामात कुणी खंडणी मागितली तर मी त्याच्यावर कारवाई करेन. चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे मी उभा राहणार नाही. काम करणाऱ्यांच्या मागे मी उभा राहीन, चुकीची कामं केल्यानं पक्षाचे नाव खराब होते. पक्षात राहायचं असेल तर चांगलं काम करा, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांनी हा इशार दिला तेव्हा धनंजय मुंडे सुद्धा त्यांच्या जवळच उपस्थित होते.बीडमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बीडमध्ये घटनेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या राजकीय गोंधळानंतर होणारी ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे सगळेच कट्टर विरोधक एकमेकांसमोर येणार आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणारे सुरेश धस, संदीप क्षीरसागर तसंच प्रकाश सोळंके हे नेते उपस्थित राहतील.
रोडेमळा लाखणगावात दोन दिवस भव्य बैलगाडा शर्यत! तुकारामशेठ पोंदे यांचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा!
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारंवार सुई मंत्री धनंजय मुंडे यांचा नीकटवर्तीय असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्याकडे जाते आहे.त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे अजित पवारांचा बीड दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
COMMENTS