प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर ) लाखणगाव दि २८ जानेवारी येथील सटवाजीबुवा यात्रेनिमित्त रोडेमळा लाखणगाव येथे बैलगाडयांसह भव्य यात्रा पा...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर )
लाखणगाव दि २८ जानेवारी
येथील सटवाजीबुवा यात्रेनिमित्त रोडेमळा लाखणगाव येथे बैलगाडयांसह भव्य यात्रा पार पडली. दोन दिवस चाललेल्या शर्यतीत चारशे चौसष्ट बैलगाडे सहभागी झाले ज्यात तुकारामशेठ लक्ष्मण पोंदे यांचा बैलगाडा दहा पॉईंट सत्तावन्न सेकंदासह प्रथम क्रमांक, घाटाचा राजा व फायनलचा मानकरी ठरल्याने भव्य करंडकासह यांनी आनंद साजरा केला.
यात्रेस स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट, भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुकाप्रमुख प्राध्यापक अनिल निघोट, पत्रकार कानसकर,उपप्राचार्य लक्ष्मण रोडे, माजी सरपंच मार्तंड टाव्हरे यानी भेट दिली यावेळी प्रा सुरेखाताई निघोट यांचा सत्कार मा सरपंच प्राजक्ता रोडे यांनी केला ,सुरेखाताई निघोट यांनी यात्रेकरू, बैलगाडमालक, शौकीन यांना शुभेच्छा देऊन भव्य यात्रा भरवल्याबद्दल रोडेमळा लाखणगाव ग्रामस्थ व यात्राकमेटीचे खास कौतुक केले.
यावेळी यात्रा कमेटी चे सतीश रोडे,घडयाळ कामकाज सोमनाथ पोंदे,दिपक रोडे तर लेखनिक म्हणून बाळासाहेब अरगडे,गणेश अरगडे, सुरेश मिंडे यांनी काम पाहिले तर रामदास पोंदे,दिपक रोडे,वसंत अरगडे,शिरीषकुमार रोडे ,निलेश रोडे,यांनी यात्रेची चोख व्यवस्था ठेवली. यात्रेत सरपंच कचर पानमंद,शांताराम घोडे यांच्यासह अनेक बैलगाडा मालक उपस्थित होते.
बैलगाडा घाटात आपल्या पहाडी आवाजात अनाउंसर पोपट शिंगाडे,बाळासाहेब टेमगीरे, बबनराव मेंगडे,संभाजी निचीत,तेजस बांगर,सौरभ पवार,रवी शिंदे,भरत कुरकुटे,निव्रुत्ती भांड यांनी धावते समालोचन करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
COMMENTS