नवी दिल्ली : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रात सध्या जोरदार गाजत आहे. या प्रकरणाला आज 51 दिवस पूर्ण झाले आहे. मात्र प्रकरणातील को...
नवी दिल्ली : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रात सध्या जोरदार गाजत आहे. या प्रकरणाला आज 51 दिवस पूर्ण झाले आहे. मात्र प्रकरणातील कोणतेही आरोपीला अद्यापही शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.
मुख्य आरोपी असलेले वाल्मीक कराड यांच्या संबंधित मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी विरोधक पहिल्या दिवसापासून आक्रमक झाले आहेत. यातच काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. यानंतर आज धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
राजीनाम्या बाबत विचारले असता धनंजय मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी मागे राजीनामा मागाव. मी जर राजीनामा देण्यास तयार आहे. मी दोष आहे की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगू शकतील, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. त्यासोबतच 51 दिवसापासून मला लक्ष केलं जात आहे नैतिक तिच्या मुद्द्यावर स्वतःहून राजीनामा देणार का ? असा प्रश्न विचारला असता त्यावर माझी नैतिकता माझ्या लोकांबाबत प्रामाणिक आहे मी जे बोलतो ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतो मी नैतिकदृष्ट्यादृष्टी नाही असे मला वाटते जर दोष असेल तर मला वरिष्ठ असे सांगतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलाय.
धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाबाबत राजीनामा देण्यात द्यावा , यासाठी राष्ट्रवादीचे एकीकालचे सहकारी आमदार संदीप क्षीरसागर भाजपचे आमदार सुरेश धस तसेच इतर विरोधी तसेच सत्ताधारी पक्षांकडून याकरिता दबाव वाढत चाललाय.
यातच वाल्मीक कराड जसा धनंजय मुंडे यांचा खास आहे तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडवणीस व अजित पवारांचे खास आहेत. त्यामुळे राजीनामा शक्य आहे अंजली दमानिया यांनी किती पुरावे दिले तरी राजांना अशक्य आहे. अशी पोस्ट संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
COMMENTS