बंगळुरू: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एकाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ल...
बंगळुरू: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एकाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लिव्ह इन पार्टनरविरोधात गुन्हा दाखल केला असून, काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
वनजाक्षी (वय ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विठ्ठल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विठ्ठल हा कॅब ड्रायव्हर आहे. तो मागील चार वर्षांपासून वनजाक्षीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. आरोपी विठ्ठल याने यापूर्वी तीन विवाह केले होते. वनजाक्षी हिचेही दोन विवाह झाले होते. यानंतर दोघंही लिव्ह रिलेशनशिपमध्ये राहत होते. विठ्ठल याला दारुचं व्यसन होते. तो दारुच्या नशेत अनेकदा वनजाक्षीला मारहाण करत असल्यामुळे दोघांमध्ये वाद होत असे. वनजाक्षी विठ्ठलपासून दूर जाऊन ती कर्नाटक रक्षण वेदिकेचा सदस्य असलेल्या मरियाप्पा या दुसऱ्या पुरूषाच्या संपर्कात आली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. घटनेच्या दिवशी वनजाक्षी आपला प्रियकर मरियाप्पा आणि चालकासह मंदिरातून परत येत होती. यावेळी आरोपी विठ्ठल याने त्यांच्या कारचा पाठलाग सुरू केला.
वनजाक्षीची कार ट्रॅफिक सिग्नलवर थांबली असताना आरोपीने त्यांची कार अडवली आणि खिडकीतून आतमध्ये पेट्रोल ओतले. वनजाक्षी, मरियाप्पा आणि ड्रायव्हर तिघांवरही त्याने पेट्रोल ओतले. मरियाप्पा आणि चालक पळून जाण्यात यशस्वी झाले, विठ्ठलने वनजाक्षीचा पाठलाग केला, तिच्यावर अधिक पेट्रोल ओतले आणि लाईटरने तिला पेटवून दिले. एका व्यक्तीने नागरिकांच्या मदतीने वनजाक्षी हिला गंभीर अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वनजाक्षी ६० टक्के भाजली होती, उपचारादरम्यान तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर पोलिसांनी विठ्ठल याला अवघ्या २४ तासांत अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS