विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यात कधीही अचारसंहितेची घोषणा होऊ शकते. मात्र ऐन विधानसभा न...
विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यात कधीही अचारसंहितेची घोषणा होऊ शकते. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अमरावती जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
निवडणुकीपूर्वी 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार प्रदीप राऊत यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्यानं पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले, त्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. राऊत यांना अवघ्या पाच महिन्यातच पदावरून हटवण्यात आल्यानं राऊत समर्थकांमध्ये नाराजी आहे.
विधासनभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. अशातच अमरावती जिल्ह्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या 25 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांना पदावरून पायउतार केल्यामुळं नाराज पदाधिकाऱ्यांनी बंड केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांच्याकडे लोकसभा निवडणुकीत अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदार संघाची प्रमुख जबाबदारी होती. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून काढून त्यांच्यावर प्रदेश संघटन सचिव ही नवी जबाबदारी देण्यात आली. विश्वासात न घेता आपल्याला पदावरून काढलं, अशी नाराजी प्रदीप राऊत यांनी व्यक्त केली. "पाच महिन्यात आम्ही पक्ष संघटना मजबूत केली नव्या नेतृत्वाची फळी उभी केली, असं असताना कुठलंही कारण न देता किंवा चर्चा न करता आपल्याला पदावरून काढून टाकलं. हा आपल्या पक्षनिष्ठेचा व कार्याचा अवमान असल्यामुळं आपण प्रदेश संघटना सचिव पदाचा राजीनामा देत आहोत," असं प्रदीप राऊत यांनी सांगितलं. तर लवकरच शरद पवार व जयंत पाटील यांची भेट घेऊ त्यांनी सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर वेगळा निर्णय घेऊ असा इशाराही प्रदीप राऊत यांनी दिला आहे.
COMMENTS