सोलापूर: सोलापूर शहरातील सिव्हील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्धावस्थेत आढळले आहेत. या दुर्दैवी घटनेत सहा वर्षांचा मु...
सोलापूर: सोलापूर शहरातील सिव्हील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्धावस्थेत आढळले आहेत. या दुर्दैवी घटनेत सहा वर्षांचा मुलगा हर्ष आणि चार वर्षांची मुलगी अक्षरा यांचा मृत्यू झाला आहे.
कुटुंब शनिवारी रात्री जेवण करून आपल्या घरात झोपलं होतं. मध्यरात्री खोलीत झालेल्या वायू गळतीमुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील बेडरफुलजवळ युवराज मोहन सिंग बलरामवाले (वय ४०) यांचे छोटं घर आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी रंजना (वय ३५), आई विमल (वय ६०), मुलगा हर्ष (वय ६) आणि मुलगी अक्षरा (वय ४) अशा पाच जणांचा समावेश आहे. युवराज बलरामवाले हे गोवंडी म्हणून काम करतात. तर पत्नी रंजना विडी कामगार आहेत. शनिवारी रात्री हे कुटुंब रात्री जेवण घरून हवा बंद खोलीत झोपले होते. रात्री झोपताना गॅस व्यवस्थित बंद न केल्यामुळे दहा बाय पाचच्या हवा बंद खोलीत वायू गळती झाली, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध झाले. रंजना यांच्यासोबत काम करणाऱ्या महिला विडीचे पत्ते घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या असता, त्यांना हे कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळले. यानंतर त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना माहिती दिली आणि सर्वांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान हर्ष आणि अक्षरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्राथमिक अंदाजानुसार गॅस गळतीमुळे गुदमरून हे कुटुंब बेशुद्ध झाले असावे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS