शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख, संपर्कप्रमुख पश्चिम महाराष्ट्र स्वाभिमानी मराठा महासंघ म्हणून काम पाहिलेल्या धडाडीच्या, निस्वार्थी साम...
शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख, संपर्कप्रमुख पश्चिम महाराष्ट्र स्वाभिमानी मराठा महासंघ म्हणून काम पाहिलेल्या धडाडीच्या, निस्वार्थी सामान्य माणुस , महिला मुलींसाठी धाव घेत, प्रसंगी लगेच संबंधितांस फोन करून न्याय मिळवून देण्यात आघाडीवर असलेल्या महिला नेत्या म्हणून ऊत्तर पुणे जिल्ह्यातील आक्रमक महिला नेतृत्व प्रा.सुरेखाताई निघोट यांना आज चार जुलै रोजी वाढदिवसानिमित्त हजारो शिवसैनिक, शिवभक्त,मराठा कार्यकर्ते, महिलाभगीनी, अधिकारी,शिक्षक सहकारी, अनेक क्षेत्रांतील यशस्वी मंडळी, मित्रमंडळी व विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांच्या शुभेच्छा प्राप्त होत आहे .
शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षफुटीनंतर पाटण भिमाशंकर ते रांजणगाव पर्यंत विविध कार्यक्रम, उपक्रम, गणेशोत्सव नवरात्रोत्सव स्पर्धा, गुणगौरव समारंभ, पुरस्कार वितरण, लग्न,महापुजा,यात्रा ऊत्सव भेटी, रुग्णालये - रुग्णवाहिका, शासकीय कार्यालये, अधिकारीवर्गाशी संपर्क ठेवून सामान्य अडचणीत असलेल्यांसाठी सदैव योग्य ती मदत तातडीने मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत असतात. अन्याय, अपघात मग तो गिरवली एसटी अपघात, नारायणगावातील भीषण अपघात किंवा एखाद्या बाईकस्वाराचा अपघात , श्वानदंश सर्पदंश असो, कुणाला तातडीच्या उपचार व दाखल करण्यासाठी ताबडतोब रुग्णवाहिका चालकांना व उपजिल्हारुग्णालयात संपर्क साधुन त्वरित उपचारासाठी कार्यरत असतात.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत माळीण,पसारवाडी अशा आदिवासी भागात जाऊन पुनर्वसन समस्येवर आवाज ऊठवुन समाजास योग्य मदतीसाठी आग्रही असतात.
कांग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती आघाडी नको म्हणून, कांग्रेस राष्ट्रवादी चं काम करणार नाही म्हणत कोणत्याही शिवसैनिकाला आंबेगाव शिरूर विधानसभेस उमेदवारीसाठी मातोश्रीवर धडक मारुनी जुन्नर आंबेगाव ची जागा राष्ट्रवादीला गेल्यानं आंबेगाव शिरूर विधानसभा निवडणुक , शिवसैनिकांच्या स्वाभिमानासाठी राष्ट्रवादीच्या चटया ऊचलायच्या नाही म्हणत अपक्ष लढल्या, पक्षानं कारवाई केली .नंतर परत शिवसेना ऊबाठा पक्षकार्य चालू होईल असं वाटुनही कित्येक वर्षे पदांवर बसलेल्यांना लढाऊ , पदरपैशानं पक्षकार्य करणारे प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक नको असल्याने, ऊद्धवजींनीही बिनकामी पदाधिकारींचंच ऐकुन पंचवीस वर्षे शिवसेनेसाठी झिजलेल्यांऐवजी संपर्कप्रमुखांच्या वशिल्याने तालुका जिल्हा पदाधिकारी सांगतील त्यांच्या नेमणूका करत पक्षासाठी अहोरात्र झटणारे च डावलल्याने सुरेखाताईंनी एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करुन आपले झंझावाती काम चालूच ठेवले, आपण ज्या शिवसेनेचं काम केले,तीच शिवसेना दिवसेंदिवस ईतर पक्षात जाणकारांची संख्या वाढुन कमी का होत जात आहे याची ऊद्धवजींच्या दरबारींनी नोंद घेऊन फक्त पदं मिरवणारे बाजूला करून शिवसैनिकांशी संवाद गरजेचा आहे,जो सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत शिवसैनिकांच्या भावना,मागण्यांची दखल घेतली जाते,शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी मी सदैव कटिबध्द आहे अशी भावना आजच्या वाढदिवसानिमित्त प्रा.सुरेखाताई निघोट यांनी व्यक्त करुन शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले.
COMMENTS