नाशिक: नाशिकच्या बिडी कामगार नगर रस्त्यावर तीन लहान मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सुट्टीच्या दिवशी तिन्ही मित्र एका मित्राच्या शे...
नाशिक: नाशिकच्या बिडी कामगार नगर रस्त्यावर तीन लहान मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सुट्टीच्या दिवशी तिन्ही मित्र एका मित्राच्या शेतात गोठ्यावर फिरायला गेले होते. परत येत असताना बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला.
विशेष म्हणजे मृत पावलेल्या तिघा मित्रांचे नाव साई आहे.
साई हिलाल जाधव (वय १४), साई केदारनाथ उगले (वय १४) आणि साई गोरख गरड (वय १५) असे मृत पावलेल्या तीन मित्रांची नावे आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी तिघेही अन्य एका मित्रासह गरड यांच्या गोठ्यावर फिरायला गेले होते. तिथे चौघेही गायीच्या वासरासोबत खेळले. गंगेवर पोहण्यास जाऊ असे ठरले. दरम्यान, गरडच्या वडिलांनी घरी लवकर जा, असे चौघांना सांगितले.
मित्र घरी निघाले होते. पण वाटेत बालमित्रांना पोहण्याचा मोह आवरला नाही. बांधकाम सुरू असलेल्या साईटवर खोदलेल्या खड्ड्यात त्यांनी पोहण्याचा निर्णय घेतला. पण यातील एका मित्र मागे फिरला. तो घरी सांगून मित्रांसोबत आला नव्हता. त्यामुळे घरी आई वाट बघत असेल म्हणून तो तिथून गेला. यानंतर ‘साई’ नावाचे हे तिन्ही मित्र खोदलेल्या खड्यात पोहण्यासाठी उतरले. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला. तिघेही गाळात रुतून बुडाले.
तिघे रविवार दुपारपासून बेपत्ता झाले होते. त्यानंतर तिन्ही कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू होता. रात्री २ वाजता मिसिंग तक्रार देण्यात आली. रात्रभर नातेवाइकांनी तिघांचा त्र्यंबक, सोमेश्वर, गंगापूर धरण, गोदाघाट आदी परिसरात शोध घेतला. मात्र सकाळी तिघांचे मृतदेह साईटवर पाण्यात आढळून आले. अभिषेक गरड यांनी गोठ्या शेजारील बांधकाम साईटवर बघितले असता तिघांचे कपडे सापडले. अग्निशामक दल, पोलिसांनी शोध घेत तिघांचे मृतदेह पाण्यात गाळात रुतलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पालक व नातलगांनी मृतदेह कवटाळत काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला.
COMMENTS