पुणे : पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव गणपती हद्दीत तिहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. दोन चिमुकल्यांसह एका महिलेचा अर्धजळीत मृतद...
पुणे : पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव गणपती हद्दीत तिहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. दोन चिमुकल्यांसह एका महिलेचा अर्धजळीत मृतदेह आढळल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
तब्बल पंधरा दिवसांनी पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती (ता. शिरूर जि. पुणे ) गावच्या हद्दीत असलेल्या ग्रोवेल कंपनी शेजारी लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे निर्जन ठिकाणी दोन चिमुकल्यांसह एका महिलेचा अर्धजळीत मृतदेह आढळून आला होता. महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष, एक मुलगा वय अंदाजे तीन ते चार वर्षे व एक मुलगा वय अंदाजे एक ते दोन वर्ष असे होते. या तिघांना प्रथम हत्याराने जीवे ठार मारण्यात आले आणि पुरावा नष्ट व्हावा यासाठी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. या घटनेतील मृतदेहांची ओळख पटलेली असून मृत महिला स्वाती केशव सोनवणे (वय २५ वर्षे रा. वाघोरा, ता माजलगाव, जि बीड ) विराज आणि स्वराज दोन मृतांची नावे आहेत. गोरख पोपट बोखारे (वय ३६, सध्या रा. सरदवाडी ता. शिरूर जि पुणे, मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर ) असे आरोपीचे नाव आहे. गोरख हा बहिणीचा दीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. स्वाती आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते. नवऱ्याच्या सतत दारु पिण्याला त्रासाला स्वाती कंटाळली होती. त्यामुळे तिने गोरखशी लग्न करण्यासाठी त्याच्याकडे तगादा लावला होता.
आरोपी गोरख पोपट बोखारे याने २३ मे रोजी त्याचेकडील मोटार सायकलवर मृत स्वाती सोनवणे आणि तिची दोन्ही मुले स्वराज आणि विराज यांना आळंदी येथून घेऊन सरदवाडी (ता. शिरूर ) येथे निघाला होता. रात्रीचे वेळी रांजणगाव गणपती गावचे हद्दीतील पुणे-नगर हायवेरोडलगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनीपासून खंडाळे गावाकडे जाणाऱ्या कच्या रोडलगत मोटार सायकल थांबवून तिने केलेल्या लग्नाचे मागणीला विरोध करायचा म्हणून स्वाती व तिचे दोन्ही मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला व पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
तिघांचे मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. घटना घडलेल्या दिवशी पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ घटनेच्या तपासासाठी सहा पथके चोवीस जिल्ह्यात रवाना केली होती. रांजणगाव एमआयडीसी आणि पुणे ग्रामीण पोलिस यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. अखेर, तिहेरी हत्याकांड गुन्ह्याची उकल करून आरोपीला अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल (पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक, रमेश चोपडे, पुणे विभाग (मा.अपर पोलिस अधीक्षक) गणेश बिरादार बारामती विभाग, एस.डी.पी.ओ. प्रशांत ढोले, शिरूर विभाग, मा. एस.डी.पी.ओ. बापूराव दडस, दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पो.स्टे चे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, AHTU पुणे ग्रा.चे पोनि विश्वास जाधव, स्थानिक गुन्हे शाखाचे स.पो.नि. दत्ताजीराव मोहिते, रांजणगाव पो स्टे चे निळकंठ तिडके, पोसइ अविनाश थोरात, मपोसई सविता काळे, शिक्रापूर पो स्टे चे पोसई महेश डोंगरे स्थागुशा चे दिपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, राजु मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, रामदास बाबर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरांदे, महेश बनकर, विनोद भोकरे, काशिनाथ राजापूरे, रांजणगाव पो स्टे चे गुलाब येळे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिने, उमेश कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, शिक्रापूर पो स्टे चे जयराज देवकर, अमोल नलगे, शिरूर पो स्टे कडील विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, बीड जिल्हयात गेलेले विशेष तपास पथकातील पोलिस अंमलदार अक्षय यादव, दरशथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमीत वाघ, यांनी केली आहे.
COMMENTS