प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर लांडेवाडीतील शेवाळवाडीत नवसाला पावणारा गणपतीच्या मंदिरात हभप शंकरमहाराज शेवाळे यांचे काल्याचे किर्तन झाले,...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
लांडेवाडीतील शेवाळवाडीत नवसाला पावणारा गणपतीच्या मंदिरात हभप शंकरमहाराज शेवाळे यांचे काल्याचे किर्तन झाले, त्यानंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादचे आयोजन करण्यात आले, ज्याला गणेशभक्त मोठ्या संख्येने ऊपस्थित होते, यावेळी महाराजांनी जुनं ते सोनं होतं,अभावात जगतानाही आनंद होता,सुखाची झोप होती,पण आता सगळं असुनही आनंद मात्र दिसत नाही, त्यासाठी सुखाचा मार्ग मिळवण्यासाठी प्रत्येकाने कर्मा बरोबर धर्म म्हणजे नामस्मरणावर भर दिला पाहिजे.
कार्यक्रमासाठी स्वाभिमानी मराठा महासंघ प.महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा.सुरेखाताई निघोट, सरपंच संगिताताई शेवाळे, पत्रकार सदानंद शेवाळे, माजी सरपंच तानाजी शेवाळे, प्रा अनिल निघोट शामराव गुंजाळ,सामाजीक कार्यकर्ते जयसिंगशेठ शेवाळे, बबनराव गव्हाणे, खंडेराव तात्या आढळराव, वसंत आढळराव, ग्रा.पं सदस्य ऊर्मिला शेवाळे,समीर ढेरंगे तसेच देवराम शेवाळे, बाळशिराम शेवाळे, नारायण शेवाळे, बबनराव शेवाळे, किसन शेवाळे, वसंत शेवाळे, नामदेव शेवाळे, संदीप शेवाळे, विजया शेवाळे, विनायक शेवाळे सर राम बेंडे व महाप्रसादाचे मानकरी प्रसाद ठकाजी शेवाळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS