मुंबईः मुंबईच्या मानखुर्द परिसरात एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षिकेच्या नवऱ्याने गेल्या सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केला आहे. आरोप...
मुंबईः मुंबईच्या मानखुर्द परिसरात एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षिकेच्या नवऱ्याने गेल्या सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीकडून सुरू असलेल्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर अखेर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केला आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी मानखुर्द परिसरात एकाच गल्लीत राहतात. गेल्या सात महिन्यांपासून पीडित मुलगी आरोपीच्या पत्नीकडे शिकवणीसाठी येत होती. तिने आरोपीच्या पत्नीकडे अरबी भाषेचे क्लास लावले होते. पीडित मुलगी शिकवणीसाठी आली असता ३१ वर्षीय आरोपीची तिच्यावर वाईट नजर पडली. यानंतर आरोपीनं तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारेन, अशी धमकीही आरोपीने दिली. त्यामुळे घाबरलेली पीडित मुलगी मागील सात महिन्यांपासून आरोपीचा अत्याचार सहन करत होती. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. ही बाब पीडितेच्या कुटुंबीयांना कळाल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली. डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत आरोपीनं पीडित मुलीचे लैंगिक शोषण केले आहे. शिकवणीसाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षिकेच्या पतीने अशाप्रकारे अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
COMMENTS