मुंबई: प्रेयसीच्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मुलीच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकल्याची संतापजनक घटना जोगेश्वरी पूर्वेत म...
मुंबई: प्रेयसीच्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मुलीच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकल्याची संतापजनक घटना जोगेश्वरी पूर्वेत मेघवाडी परिसरात घडली आहे. शिवाय, लैंगिक अत्याचार करून नराधमाने व्हिडिओ शूट केला.
आरोपीसह (वय 24) त्याच्या प्रेयसीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
जोगेश्वरी पूर्व भागातील मेघवाडी परिसरात राहणारी प्रेयसी (वय २१) कामावर गेल्यावर तिच्या 10 वर्षांच्या मुलीवर आरोपीने वारंवार अत्याचार केला. अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकत या संपूर्ण कृत्याचा व्हिडीओ नराधमाने शुट केला. त्यानंतर पुन्हा मुलीवर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार पीडित मुलीच्या आईला कळल्यानंतर आरोपी प्रियकराने महिलेवरही टोकदार वस्तूने हल्ला केला. जर कोणाला या प्रकाराची माहिती दिली तर काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर महिलेने मेघवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मेघवाडी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या प्रेयसीला म्हणजेच पीडित अल्पवयीन मुलीच्या आईलाही अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास मेघवाडी पोलिस करत आहेत.
COMMENTS