सोलापूर: सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील एका घरात युवक आणि युवतीने एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाल...
सोलापूर: सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील एका घरात युवक आणि युवतीने एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून, पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
रोहित ठणकेदार आणि अश्विनी केशापुरे असे आत्महत्या करणाऱ्या दोघांची नावे आहेत. दोघेही २३ वर्षांचे होते. दोघांनी एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या लिहीलेल्या चिठ्ठीत आपण भाऊ-बहीण असल्याचा उल्लेख केला आहे. रोहित हा अश्विनीला बहीण मानत होता, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. अशाप्रकारे दोघांनी आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दोघांनी चिठ्ठीत लिहिले की, ‘आम्ही दोघं बहीण भाऊ आहोत, विनाकारण आमच्यावर संशय घेऊ नका. आमच्या आत्महत्येला आई वडील जबाबदार नाहीत. एकाच वयाच्या दोघांनी अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते, यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुरामुळे दोघांच्या मृत्यूचे गूढ वाढलं आहे. दोघांनी आत्महत्या का केली, याचा तपास पोलिस करत आहे.
रोहित हा चालक म्हणून काम करत होता. तर अश्विनी हिने बी फार्मसीचे शिक्षण घेतले होते. दोघांनीही आदल्या दिवशी स्टेटस ठेवून आपण भाऊ-बहीण असल्याचा उल्लेख केला होता. यानंतर त्यांनी एकाच ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी सिव्हील पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS