मुंबई: महामार्गावरून प्रवास करताना वारंवार टोल भरण्याची कटकट असते. बॅलन्स पाहा, रिचार्ज करा, फास्ट टॅगमधून टोल कट होतो की नाही ते चेक करा....
मुंबई: महामार्गावरून प्रवास करताना वारंवार टोल भरण्याची कटकट असते. बॅलन्स पाहा, रिचार्ज करा, फास्ट टॅगमधून टोल कट होतो की नाही ते चेक करा. पण, 3000 रुपयांचा पास एकदाच काढून वर्षभर टोल न भरता फिरू शकता.
याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने फास्ट टॅगवर आधारीत 3000 रुपयांची एक स्कीम लाँच केली आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. ही योजना संपूर्ण देशात एकाच वेळी लागू करण्यात येणार आहे.
3000 रुपयांमध्ये चालकाला 200 ट्रिप करता येतील अशी अट ठेवण्यात आली आहे. ही योजना नॉन कमर्शियल, खासगी वाहनं, कार, जीप आणि व्हॅनसाठी लागू असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 3000 रुपये किंमतीचा फास्ट टॅग पास सुरू करण्यात येणार आहे. देशातील राष्ट्रीय महामार्गावर अडथळ्याशिवाय प्रवास सुकर व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
टोल प्लाझावर वाहनांची गर्दी होऊ नये, वाहतूक कोंडी टाळणे आणि वेळ वाचवणे यासाठी हे पर्याय देण्यात आले आहेत. वार्षिक पास योजना लाखो खाजगी चालकांसाठी जलद, सुरळीत आणि चांगल्या प्रवास अनुभवासाठी सुरू करण्यात येत आहे. एकदाच पैसे भरायचे, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल प्लाझावर हे चालणार आहे. या योजनेमुळे केवळ पैसे वाचणार नाहीत तर वेळ आणि प्रवासाचा अनुभवही सुधारेल. देशभरातील टोल प्लाझावरील जाम, फास्टॅग स्कॅन आणि वारंवार पेमेंट करण्याच्या समस्यांपासून आराम मिळणार आहे.
संबंधित पास राजमार्ग यात्रा अॅप आणि एनएचएआय आणि एमओआरटीएचच्या वेबसाइटद्वारे हा पास घेता येणार आहे. सरकारकडून याची लिंक लवकरच जाहीर केली जाणार आहे. जे दररोज ऑफिस किंवा व्यवसायात प्रवास करतात त्यांना याचा सर्वात मोठा फायदा होईल. याशिवाय, हा लांब ड्राइव्ह प्रेमींसाठी एक बोनस आहे. यामुळे वार्षिक सहलींचे नियोजन स्वस्त होईल. याशिवाय, पारदर्शकता आणि वादांमध्ये मोठी घट होईल. शिवाय, तासन्तास ट्रॅफिकमध्ये उभे राहण्याची किंवा पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही. ३,००० रुपयांमध्ये, तुम्हाला एक वर्षाचा "नॅशनल टोल फ्रीडम पास" मिळणार आहे.
COMMENTS