प्रतिनिधी : सुरंजन काळे घोडेगाव - लग्नाचे आमिष दाखवून गिरवली (ता. आंबेगाव) येथील दिपक गोपाळ पाटील सैद यांनी मुंबई घाटकोपर येथील एका महिलेवर ...
प्रतिनिधी : सुरंजन काळे
घोडेगाव - लग्नाचे आमिष दाखवून गिरवली (ता. आंबेगाव) येथील दिपक गोपाळ पाटील सैद यांनी मुंबई घाटकोपर येथील एका महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केले. तसेच तिची अल्पवयीन मुलगी हिचा विनयभंग केल्याप्रकरणी दिपक पाटील सैद यांच्यावर घोडेगाव पोलीसांनी आर्थिक फसवणूक, बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून शिताफीने आरोपीला अटक केली आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी दिली.
फिर्यादीत महिलेने म्हटले आहे की दिपक पाटील सैद यांनी ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम करत असल्याचे सांगून विश्वास संपादन करून महिलेचे पैसे झिरोदा या शेअर मार्केट अकाऊंटवरून 24 लाख 88 हजार 663 रूपयांचे शेअर्स दिपक पाटील यांच्या फाईव्ह पेसा या अॅपच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करून महिलेची आर्थिक फसवणुक केली. या महिलेने वारंवार पैशाची मागणी केली परंतु आरोपीने कोणती दखल घेतली नाही.तसेच लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार व फसवणूक केली.
मी माझे जीवन संपवून त्यामध्ये तुला अडकवीन अशी धमकी आरोपीने दिली.
दिपक पाटील सैद याने अनेक गुन्हे केल्याचे शक्यता लक्षात घेवून आरोपीला घोडेगाव पोलीसांनी सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार व पोलीस उपनिरीक्षक महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अटक केले. आरोपी याची क्रेटा गाडीतून फरार होण्याच्या मार्गावर असताना पोलिसांनी त्याला अटक केली. दिपक पाटील यांनी कोणाची फसवणूक केली असेल तर घोडेगाव पोलीस ठाण्यात येवून तकार करावी. असे आवाहन पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी केले आहे.
याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश पवार करत आहे.
COMMENTS