लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकराला रात्रीच्या वेळी भेटण्यासाठी केवळ 15 वर्षांच्या मुलीने तिच्या आईला सलग तीन महिने झोपेच्या गोळ्या दिल्या. आई...
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकराला रात्रीच्या वेळी भेटण्यासाठी केवळ 15 वर्षांच्या मुलीने तिच्या आईला सलग तीन महिने झोपेच्या गोळ्या दिल्या. आईची तब्येत सतत बिघडत गेली आणि वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरात झोपेच्या औषधाचं प्रमाण अधिक असल्याचे निदान झाले.
चौकशीत मुलीने गुन्हा कबूल केला असून, ती दररोज आईच्या जेवणात तीन ते चार झोपेच्या गोळ्या मिसळायची.
तपासादरम्यान मुलीकडे एक विषाची बाटली सापडली होती, जी तिला तिच्या प्रियकराने दिली होती. तिने कबुली दिली की, तिने आपल्या आईला ठार मारण्याचा कट रचला होता. पण, अखेर ती योजना रद्द करत केवळ झोपेच्या गोळ्यांपुरतीच मर्यादित राहिली. सध्या त्या मुलीला समुपदेशनासाठी पाठवण्यात आले असून एका निवारागृहात ठेवण्यात आले आहे.
एका अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या सांगण्यावरून आपल्या आईला झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत. तिच्या या टोकाच्या कृतीमागे तिच्या प्रियकराने दिलेला चुकीचा सल्ला आणि मुलीचं त्याच्यावरील भावनिक आकर्षण हे कारणीभूत ठरले. यामुळे आईची प्रकृती खालावली होती. पण, वेळीच उपचार केल्यामुळे जीव बचावला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
COMMENTS