धुळे: धुळे तालुक्यातील वलवाडी गावातील लष्करात असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा कपिल बागुल हिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप शारदा हिच्या ...
धुळे: धुळे तालुक्यातील वलवाडी गावातील लष्करात असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा कपिल बागुल हिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप शारदा हिच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
शारदा हिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या भावाला भडगाव येथे फोन करून सांगितले की, तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. तातडीने सगळेजण अंत्यसंस्कारासाठी धुळ्यात या. त्यासाठी, कपिल बागुल याने अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली होती आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी ते जाणार तेवढ्यातच माहेरील मंडळी दाखल झाली. त्यावेळी शाब्दिक वाद झाल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनीही माहिती जाणून घेत कारवाईला सुरुवात केली आहे.
सन 2010 साली कपिल बागुल आणि शारदा या दोघांचा विवाह झाला होता. त्यानंतर पती कपिल बागुल हा पत्नीचा छळ करत होता. याबाबत जळगाव येथील महिला आयोगाकडे मागील वर्षीच तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु महिला आयोगाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही, असा आरोप शारदा हिच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे कपिल बागुल याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे. कपिल बागुल याने पत्नी शारदा बागुलचा मध्यरात्री मारहाण केली, त्यानंतर मुलगी आणि मुलाला नातेवाईकांकडे पाठवून दिले होते.
पोलिसांनी तातडीने कपिल बागुल याला अटक करावी अशी मागणी महाजन कुटुंबीयांनी केली आहे. या संदर्भात पुढील कारवाई धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलिस करत आहेत.
COMMENTS