नारायणगाव ता.ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगावच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम नु...
नारायणगाव ता.ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगावच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम नुकताच नारायणगाव येथे संपन्न झाला.
कार्यक्रम प्रसंगी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार साहेब,सामाजिक कार्यकर्त्या व सुप्रसिद्ध व्याख्यात्या प्रा.शितल ठुसे,करिअर गाईडन्स मार्गदर्शक राजीव पाटील,साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे,महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर,जुन्नर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कवडे,माजी अध्यक्ष रवींद्र वाजगे,अर्थसंपदा पतसंस्थेचे संचालक शरदराव शिंदे,जुन्नर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे मानद सचिव अंबादास वामन,माजी उपसभापती अविनाश शिंगोटे,संचालक सचिन मुळे,वारूळवाडी केंद्रप्रमुख दिनेश मेहेर,प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गडगे,खजिनदार विजय नागरे,सचिव साईनाथ कनिंगध्वज,मनिषा कानडे,आशुतोष गडगे,मनोहर भोसले,मनोहर वायकर,बबन सानप,संदिप थोरात,निलेश शेळके व ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगावचे सर्व सभासद शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात यश श्रीकांत फुलसुंदर,मृदुला मंगेश मेहेर,प्रणवी गणेश बिडवई,आदित्य बबन सानप,सोहम दत्तात्रय हांडे या इयत्ता बारावीतील तर स्वरांगी संदिप थोरात,अथर्व अंबादास वामन,वेदिका दिनेश मेहेर,आयुष मिलिंद औटी,अपूर्वा विजयकुमार वामन व श्रीनिवास ज्ञानेश्वर शिर्के या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,साईबाबांची प्रतिमा,शाल व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी वेदिका दिनेश मेहेर व यश श्रीकांत फुलसुंदर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार साहेब,प्रा.शितल ठुसे,राजीव पाटील यांनी विद्यार्थ्यांना "भविष्यातील शिक्षण व त्याचे महत्त्व" या विषयावर मार्गदर्शन केले व अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानचे सदस्य मिलिंद औटी,शामराव बटवाल,गणेश बिडवई,दत्ता हांडे,रुपेश पवार,निर्मला मेहेर,वनिता गडगे,अलका मेहेर,भारती कनिंगध्वज,राणी शेळके यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गडगे तर सूत्रसंचलन प्रतिष्ठानचे सचिव साईनाथ कनिंगध्वज यांनी केले व आभार प्रतिष्ठानचे खजिनदार विजय नागरे यांनी मानले.
COMMENTS