मुंबई : शहरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवली आहे. जेव्ह आपण आपल्या आयुष्यात चुकीचा जोडीदार निवडतो तेव्हा आपलं आयुष्यावर किती मोठा परिणाम हो...
मुंबई : शहरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवली आहे. जेव्ह आपण आपल्या आयुष्यात चुकीचा जोडीदार निवडतो तेव्हा आपलं आयुष्यावर किती मोठा परिणाम होतो. याचं उदाहरण देणारी घटना समोर आली आहे.
एका तरुणीने प्रेम आणि लग्न करण्यासाठी चुकीच्या व्यक्तीची निवड केली ज्यामुळे तिच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलं. या तरुणीनं आपल्या सख्ख्या मामाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ती त्या हट्टावर अडून बसली. त्यानंतर पुढे जे घडलं त्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं.
प्रेम की वेड?
डुडवा धर्मपुरी येथे राहणाऱ्या नाझिया बानो हिला आपल्या सख्ख्या मामाशी, अब्दुल कलीमशी प्रेमसंबंध होते. घरच्या लोकांनी अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशीच लग्न करणार असा तिने ठाम निश्चय केला. या नात्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत होतं.
बुधवारी सकाळी घरात या विषयावर मोठा वाद झाला. नाझियाला तिच्या प्रेमसंबंधांवरून पुन्हा समज देण्यात आली. त्यानंतर घरी खूप मोठी भांडणं झाली. या भांडणानंतर ती घराच्या छतावर असलेल्या टीनशेडच्या खोलीत जाऊन बसली. खूप वेळ झालं ती बाहेर आली नाही, त्यानंतर घरच्यांना थोडा संशय आला, ज्यामुळे ते तिला शोधायला गेले. तेव्हा त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचं दिसलं, ज्यानंतरजबरदस्तीने दरवाजा उघडला तेव्हा त्यांना तिचा मृतदेह समोर दिसला.
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सच्चिदानंद पांडेय आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासानुसार, नाझियाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, तिच्या प्रेमसंबंधात असलेल्या अब्दुल कलीमची कसून चौकशी केली जात आहे.
आता पुढे काय?
पोलिसांनी मृत मुलीच्या कुटुंबीयांकडून तक्रार मिळाल्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. नाझियाने टोकाचं पाऊल उचललं, की या प्रकरणामध्ये काही वेगळं गूढ आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.
ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. काय खरं आणि काय खोटं, याचा उलगडा आता पोलीस तपासातच होणार आहे.
COMMENTS