प्रतिनिधी: प्रा. अनिल निघोट सर आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी गावात तीथीप्रमाणे भव्य शिवजयंती ऊत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांच्या...
प्रतिनिधी: प्रा. अनिल निघोट सर
आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी गावात तीथीप्रमाणे भव्य शिवजयंती ऊत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजी सह भव्य मिरवणूक काढण्यात आली,ज्यात गावातील लहानथोर आबालवृद्ध, युवक, युवती सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येने आपले आराध्यदैवत परमपराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी ऊपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळयाचे पुजन व व्याख्याते सचिन आनंदे यांचा सन्मान आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हाप्रमुख प्रा.अनिल निघोट यांचे शुभहस्ते करण्यात आला, प्रसिद्ध शिवव्याख्याते सचीन आनंदे आळंदी यांचे शिवचरीत्रपर व्याख्यान ठेवण्यात आले,त्यांनी आपल्या पहाडी आवाजात शिवरा,राजमाता जिजाऊ,धर्मवीर संभाजीराजे यांचे अनेक ऐतिहासिक प्रसंगाचे वर्णन करत शिवकाल जागा केला,ऊपस्थित शिवपुत्र आणि शिवकन्यांना छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन संस्कार अंगी बाणवत आपल्या मुलाबाळांमध्ये शिवविचार रुजवण्याचे आवाहन केले.
शत्रुंनीही ज्यांचं कौतुक केलं,ज्यांनी परस्त्री मातेसमान मानुन,रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश देणारा,आपल्या जीवास जीव देणारया मावळयांना घेऊन शुन्यातुन स्वराज्य ऊभे करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय अशी शिवरायांची महती सांगितली . व्याख्यानानंतर सर्वांसाठी छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा चित्रपट दाखवण्यात आला
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक जयसिंग वाळुंज यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वाळुंजवाडी नगरीतील युवक मंडळ व समस्त ग्रामस्थ वाळुंजवाडी यांनी ऊत्कृष्ट नियोजन करुन आपल्या एकी चे दर्शन घडवले.
COMMENTS