देशभरातील शेतकरी सध्या पीएम किसान योजनाच्या 19 व्या हप्त्याची वाट बघत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असताना याचे पैसे जमा केले ज...
देशभरातील शेतकरी सध्या पीएम किसान योजनाच्या 19 व्या हप्त्याची वाट बघत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असताना याचे पैसे जमा केले जाणार आहेत. 24 फेब्रुवारी रोजी शेतकर्यांच्या खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सम्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जमा करतील.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिली होती. देशातील जवळपास 13 कोटी शेतकर्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. मात्र, त्यापूर्वी शेतकऱ्यांना एक महत्वाचे काम करावे लागणार आहे, त्याशिवाय पैसे जमा होणार नाहीत.
पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकर्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नियमानुसार ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ई-केवायसी प्रक्रिया केली नाही तर हप्ता जमा होणार नाही. यासाठी शेतकरी http://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. (PM Kisan Scheme)
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर ते करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन किंवा PM किसान पोर्टल/अॅपद्वारे ऑनलाइन ई-केवायसी करता येईल. (PM Kisan)
देशभरातील कोट्यवधी शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, ई-केवायसी आणि जमीन पडताळणी पूर्ण न केल्यास हा हप्ता बँक खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय या योजनेचा लाभ घेता येईल.
तसेच, या योजनेबाबत काही नियम देखील बदलण्यात आले आहेत. त्यानुसार एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येईल.शेतकऱ्यांनी ही नियमावली एकदा वाचून घ्यावी.
COMMENTS