प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर गावरवाडी तालुका आंबेगाव येथेधर्मनाथ महाराज यात्रेनिमित्त दोन दिवस ३३० बैलगाडयांसह भव्य बैलगाडा शर्यतींचे आ...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
गावरवाडी तालुका आंबेगाव येथेधर्मनाथ महाराज यात्रेनिमित्त दोन दिवस ३३० बैलगाडयांसह भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले,ज्यात हिंदकेसरी बैलगा संघटना साल, महादु भोर असे नामवंत बैलगाडामालक सहभागी झाले होते.ज्यात गंगाराम मनाजी बारवे यांचा बैलगाडा अकरा पाईंट अडतीस सेकंदासह फायनल चा मानकरी ठरला.,सचिनशेठ शालीवाहन गव्हाणे, सोपान बबन निघोट, संतोष विठ्ठल पिंगळे, प्रतिक भक्ते,सिद्धेश बांगर,सिताराम काळे लक्ष्मी संतोष घोडेकर,यांच्याही बैलगाडयांनी फायनल मध्ये रसकांची मने जिंकली .
यात्रेस स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट ,भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुकाप्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यात्रा कमिटी अध्यक्ष दिनकर फदाले,कचरदास वाळुंज, अविनाश पोखरकर,अर्जुन फदाले,कृष्णदास फदाले,अभिषेक पोखरकर, सागर माटे यांनी ऊत्तम व्यवस्था पाहिली.
बैलगाडा शर्यतीचे आपल्या पहाडी आवाजात समालोचन बबनराव मेंगडे, नवनाथ वाळुंज, प्रदीप भोर,अरुण भोर,स्वप्नील सोनवणे, निव्रुत्ती भांड यांनी करून बैलगाडा रसिकांची मने जिंकली व बैलगाडा शर्यतीच्या थराराचा प्रेक्षकांना अनुभव दिला.
COMMENTS