Jio Calling Plan : जिओ ही सध्या भारतातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी असून ग्राहकांना उत्तम नेटवर्क आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन्स देण्यासाठी...
Jio Calling Plan : जिओ ही सध्या भारतातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी असून ग्राहकांना उत्तम नेटवर्क आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन्स देण्यासाठी ओळखली जाते. गेल्या काही वर्षांत जिओने आपल्या योजनांमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत.
परंतु त्याचवेळी प्लॅनच्या किमतीही वाढल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका अशा ग्राहकांना बसतो जे फक्त कॉलिंगसाठी सिम वापरतात आणि नियमित डेटा पॅक वापरत नाहीत.
खासदाराने महिलेसोबत सलग पाच वर्षे ठेवले शारीरिक संबंध अन मग घडलं असं काही.
अशा ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन जिओने नुकतेच नवीन कॉलिंग रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. यामध्ये केवळ कॉलिंग आणि एसएमएस सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. ज्यामुळे ग्राहकांना महागड्या डेटा पॅकसाठी पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही.
शिवाय, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या नव्या नियमांनुसार सर्व टेलिकॉम कंपन्यांनी केवळ कॉलिंगसाठी स्वतंत्र रिचार्ज प्लॅन सादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर जिओने २०२५ साठी नवीन प्लॅन सादर केले आहेत.
जिओचे नवीन कॉलिंग रिचार्ज प्लॅन्स (२०२५)
८४ दिवसांचा कॉलिंग रिचार्ज प्लॅन - ₹४९८ वैधता: ८४ दिवस,अमर्यादित कॉलिंग, १००० मोफत एसएमएस आणि मात्र या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट नाही. मुख्यतः फक्त कॉलिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लान फायद्याचा आहे.
३६५ दिवसांचा (१ वर्ष) कॉलिंग रिचार्ज प्लॅन - १९९८ रुपये, व्हॅलिडीटी ३६५ दिवस (१ वर्ष),संपूर्ण वर्षभर अमर्यादित कॉलिंग,३६०० मोफत एसएमएस मिळतात
परंतु या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट नाही
कोणासाठी उपयुक्त?
वार्षिक रिचार्ज करून दीर्घकालीन सेवा घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन उपयुक्त आहे.
नवीन प्लॅनचा फायदा कोणाला होईल?
ज्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएस सुविधा हवी आहे, त्यांच्यासाठी हे प्लॅन्स अत्यंत फायदेशीर आहेत.नियमित डेटा वापरत नसलेल्या ग्राहकांना महागड्या डेटा पॅकची गरज भासणार एका मोठ्या कालावधीसाठी रिचार्ज करून वारंवार रिचार्ज करण्याच्या झंझटीतून सुटका मिळेल.
COMMENTS