लखनौ (उत्तर प्रदेश): एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी विद्यमान काँग्रेस खासदाराला अटक केली आहे. आरोपी खासदाराने लग्नाचे आमिष दाख...
लखनौ (उत्तर प्रदेश): एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी विद्यमान काँग्रेस खासदाराला अटक केली आहे. आरोपी खासदाराने लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला आहे.
सलग पाच वर्षे हा धक्कादायक प्रकार सुरू होता. याप्रकरणी पीडित महिलेने काँग्रेसच्या खासदारावर गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित खासदार फरार झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
राकेश राठोड असे अटक झालेल्या काँग्रेस खासदाराचे नाव असून, ते उत्तर प्रदेशातील सीतापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. एका महिलेवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झालेल्या राकेश राठोड यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुरुवारी त्यांना अटक केली. अटकेच्या एक दिवस आधी न्यायालयाने काँग्रेस खासदार राकेश राठोड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. सुनावणीनंतर न्यायमूर्ती राजेश कुमार सिंह यांच्या एकल खंडपीठाने राठोड यांना दोन आठवड्यांत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वी, न्यायालयाने सोमवारी राठोड यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट (एनबीडब्ल्यू) जारी केले होते.
महिलेने आरोप केला आहे की, 2018 मध्ये राकेश राठोड यांना पहिल्यांदा भेटली. त्यावेळी राठोड आमदार होते. राठोड यांनी पीडित महिलेला सीतापूर येथील तैलिक महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष बनवले. 2020 मध्ये ती राकेश राठोड यांच्या घरी गेली होती. यावेळी राठोड यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. तेव्हापासून खासदार राठोड पीडितेला सतत ब्लॅकमेल करत होते, असा आरोपही पीडितेने केला आहे. राकेश राठोड यांनी पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष पीडितेला दाखवले होते. यातून राठोड यांनी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले, असेही पीडिते महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS