पुणे शहरातील येरवडा परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ठेकेदारवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात संबंधित ठेकेदार जखमी झ...
पुणे शहरातील येरवडा परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ठेकेदारवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात संबंधित ठेकेदार जखमी झाला असून, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
रितेश परदेशी असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते ठेकेदारीचं काम करतात. उमेश वाघमारे असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता परदेशी आपल्या दुचाकीने येरवड्यातील जयजवान नगर परिसरातून जात होते. यावेळी तिथे उमेश वाघमारे तिथे आला. त्याने कपड्यांमध्ये कुऱ्हाड लपवली होती. हल्ला करण्यापूर्वी त्याने परदेशी यांना थांबवले आणि अचानक कुऱ्हाडीने वार करायला सुरुवात केली.
परदेशी यांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीचा वार आपल्या हातावर झेलला. हल्ला झाल्यानंतर ते दुचाकीसह खाली पडले. यानंतर आरोपी वाघमारे याने परदेशी यांच्यावर एकपाठोपाठ एक वार केले. भररस्त्यात हा हल्ला झाल्यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांना पाहून आरोपी वाघमारे घटनास्थळावरून फरार झाला. जखमी झालेल्या परदेशी यांना नागिरकांनी रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जखमी रितेश परदेशी आणि हल्लेखोर उमेश वाघमारे एकमेकांना ओळखतात. पण परदेशी यांचे उमेश वाघमारे यांच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय उमेशला होता. यातूनच त्याने परदेशी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परदेशी यांच्यावर उपचार सुरू आहेत.’ दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी घटनास्थळी भेट घेतली. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
COMMENTS