यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५ अंतर्गत जुन्नर तालुक्याच्या तालुकास्तरीय स्पर्धा व्ही.जे.इंटरनॅशनल स्कूल नगदवाडी ता....
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५ अंतर्गत जुन्नर तालुक्याच्या तालुकास्तरीय स्पर्धा व्ही.जे.इंटरनॅशनल स्कूल नगदवाडी ता.जुन्नर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.यामध्ये वैयक्तिक व सांघिक अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता.१९ व २० डिसेंबरला दोन दिवस स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती जुन्नरच्या गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे,शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग,विष्णू धोंडगे,अरुणा बोऱ्हाडे,सर्वश्री काळे व तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख विविध शाळांचे मुख्याध्यापक,सर्व संघटना पदाधिकारी,शिक्षक,ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी खेळाडू आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व शिक्षकांच्या सहकार्याने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व स्पर्धा पार पडल्या.
जिल्हा परिषद नगदवाडी शाळेने लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तसेच नगदवाडी शाळेतील विद्यार्थीनी रंजना रमेश चव्हाण हिने लहान गटात ५० मी.धावणे व दोरीवरून उंच उडी मारणे या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. शाळेतील यशस्वी खेळाडूंना शाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर,विद्या वाघ,मंगेश मेहेर,सुप्रिया अभंग,पंडित चौगुले,आशा आरेकर,उज्वला कांबळे व निलेश शेलार या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे,शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग,केंद्रप्रमुख अशोक हांडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे व सर्व सदस्य,शाळा सल्लागार समिती अध्यक्ष सुरेश बढे व सर्व सदस्य,पालक व ग्रामस्थ नगदवाडी यांनी नगदवाडी शाळेचे अभिनंदन केले.
नगदवाडी शाळेतील विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
COMMENTS