जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाळे ता. जुन्नर जि. पुणे येथे श्रावणधारा काव्यमहोत्सव समितीचे सदस्य डॉ खंडू माळवे(कवी लेखक शाहिर "राजपत्र...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाळे ता. जुन्नर जि. पुणे येथे श्रावणधारा काव्यमहोत्सव समितीचे सदस्य डॉ खंडू माळवे(कवी लेखक शाहिर "राजपत्र")डॉ प्रविण डुंबरे(साहित्यिक) प्रा नागेश हुलवळे(वर्ल्ड व्हिजन टाईम्स संपादक) , सुरेश डुंबरे(आर्टिस्ट कलाकार)रणजित पवार (संत गाडगेबाबा विचारमंच संस्थापक) संजय गवांदे(साहित्यिक) तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश साबळे(साहित्यिक) लाभले या शाळेचे आदर्श शिक्षक पाठ्यपुस्तकातील सुप्रसिद्ध कवी उत्तम सदाकाळ अधिक वर्ल्ड व्हिजन टाईम्स संपादक प्रा नागेश हुलवळे सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शाळेच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, व गुलाबपुष्प आणि उत्तम सदाकाळ यांचे "पाऊस" हा बालकवितासंग्रह पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला शाळेतील बालकवी ज्ञानेश्वरी शेळके, मयुर पारधी, कुणाल शेळके, भारती शेळकंदे, साक्षी बगाड, या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता ओघवत्या शैलीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली यापुर्वी वर्ल्ड व्हिजन टाईम्स मधे कविता प्रकाशित करण्यात आल्या होत्या, विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात असे स्पष्ट केले की या आमच्या शाळेचे शिक्षक उत्तम सदाकाळ सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन केले म्हणूच आम्ही लिहिते झालो करंजाळे येथील नैसर्गिक वातावरणाचा त्यांना कविता लिहिण्यासाठी उपयोग होतो उपस्थित साहित्यिकांनी आपल्या मनोगतातून मुलांना साहित्याविषयी मार्गदर्शन केले तसेच त्यांनी स्वतः च्या बालकवितांचे सादरीकरणही केले श्रावणधारा काव्यमहोत्सव समितीच्या वतीने बालकवींची सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, आणि काव्यसंग्रह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे पदवीधर शिक्षक व शिक्षक पथसंस्थेचे माजी सभापती श्री साहेबराव मांडवे यांनी सदर सत्कार विद्यार्थ्यांच्या भविष्यातील साहित्य निर्मिती आणि सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले माजी प्राचार्य सुरेश डुंबरे (कलाशिक्षक) यांनी शाळेतील मुलांसाठी चित्रकला कार्यशाळा तसेच स्पर्धेचे आयोजन करणार असल्याची घोषित केले समितीचे सदस्य आणि प्रकाशक रणजित पवार यांनी शाळेतील मुलांच्या कवितांचा प्रतिनिधिक काव्यसंग्रह विनामूल्य प्रकाशित करणार असल्याचे जाहीर केले.
त्याचप्रमाणे डॉ खंडू माळवे प्रकाशित बालकविता संग्रह "अंगाईत" विनामूल्य वाटण्यात येईल यावेळी शाळेचे सहशिक्षक नंदकुमार साबळे व सौ सरला दिवटे यांनी असे सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अश्या प्रकारच्या संधी उपलब्ध होणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे डॉ प्रविण डुंबरे यांनी अतिशय मनोरंजक बालकविता सादर करून विद्यार्थ्यांना खळवळून हलविले शाळेच्या प्रवेशद्वारावरील रांगोळी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होती विद्यार्थ्यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत वाॅटर क्लॅपच्या विशिष्ट पध्दतीने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते मा उत्तम सदाकाळ सर यांनी कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचालन केले व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री नागदेव मुठे यांनी केले तर साहेबराव मांडवे सर यांनी आभार प्रदर्शन करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
COMMENTS