प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी अशी व्यक्ती नक्कीच असते , जी आपल्याला योग्य दिशा दाखवून देत असते. माणूस जन्माला आल्यापासून तर शेवटच्या श्वासा...
प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी अशी व्यक्ती नक्कीच असते , जी आपल्याला योग्य दिशा दाखवून देत असते. माणूस जन्माला आल्यापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या जीवनात येणाऱ्या , भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकत असतो. मग ते चांगले असो वा वाईट प्रसंग असो. यातूनच तो घडत असतो. चांगले मित्र चांगले अनुभव जेवढे यशस्स्वीतेच्या
मार्गाकडे नेतात तितकेच माणूस हा वाईट अनुभव खडतर परिस्थिती यातूनच घडत असतो.
पहिले गुरू म्हणजे आई.
दुसरे गुरू म्हणजे वडील.
तिसरे गुरू म्हणजे शिक्षक.
जन्मापासून चालायला , बोलायला शिकवतात ते आईवडील. जसजसे मोठे होऊ लागतो तेव्हा विद्याज्ञानाचे काम करतात ते म्हणजे शिक्षक. विद्याज्ञानासोबतच आपल्याला जीवनाचे योग्य मार्गदर्शन करून समाजात कसं वावरावं लागत याचे ही धडे देऊ लागतात. परंतु ते स्वतः अनुभवल्याशिवाय चांगले वाईट समजत नाही. म्हणूनच ‘ अनुभव हा माणसाचा सर्वोत्तम गुरू मानला जातो.’ अनुभवांतूनच माणूस घडत असतो. चांगल्या वाईट व्यक्तींची पारख करत असतो. यातूनच त्याच्या जीवनातील गुरूंचे स्थान तो ठेवत असतो. बऱ्याचदा व्यक्ती जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत असतो. तेव्हा त्यास योग्य गुरू मार्गदर्शन भेटेलच असे नाही. अशावेळी तो स्वतःतच स्वतःचा गुरू शोधत असतो. कठीण परिस्थिती त्याला त्याच्या पायावर उभे राहण्यास भाग पाडत असते. कारण प्रत्येक व्यक्तीला गुरू भेटेल आणि ते कायम सोबत असतीलच असं नाही. असे असले तरी प्रत्येकाच्या मनात कुणी ना कुणी आदर्श व्यक्ती असतेच. मग ती कायम सोबत असो वा नसो. आदर्श व्यक्तींची प्रेरणा मनात ठेऊन जिद्दीने जो लढतो तोच खरा शिष्य. अन् प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर कुणा न कुणाचा शिष्य असतोच.
गुरू म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा
गुरू म्हणजे दुःखातून सुखाकडे नेणारा
गुरू म्हणजे संकटातून मार्ग दाखवणारा
गुरू म्हणजे एक चांगला मित्र
गुरू म्हणजे योग्य वळणावर नेणारा
गुरू म्हणजे न्यायाचा मार्ग दाखवणारा
गुरू म्हणजे सर्वांवर प्रेम करणारा
गुरू म्हणजे कठीण परिस्थितीत बळ देणारा
गुरूंच्या चरणी अर्पण सर्वस्व..!
आयुष्यात भेटलेले गुरू खरोखरच अविश्वसनीय , अविस्मरणीय असतात. त्यांचे ऋण फेडणे म्हणजे ‘ एकलव्याने गुरू द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा म्हणून दिलेला डाव्या हाताचा अंगठा.’ तो ही त्यास कमी वाटे. गुरुंमुळे जीवन किती अन कधी बदलून जाते ते समजत नाही. आज बरेच मुले मोठे होऊन त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करतात. सायबर क्राईम , असलेल्या ज्ञानाचा समाजासाठी हानिकारक कृत्य अपायकारक साधने निर्मिती करून करतात. एकतर पर्याय म्हणून चोरी करणे , किंवा दारूच्या आहारी व्यसनाधीन होणे , अशी तरुण पिढी आजकाल दिसते. म्हणूनच जर मुलांवर लहानपणापासूनच योग्य ते सुसंस्कार , माणुसकीचे धडे , स्वकर्तृत्व जर प्रत्येकाच्या मनामनात बिंबवले गेले तर वाईट मार्ग सोडून हीच मुले योग्य वळणावर व ज्ञानाचा वापर समाजासाठी , लोकसेवेसाठी करतील . ज्यांना योग्य मार्गदर्शन गुरूंचा सहवास भेटतो त्यांचा प्रश्न येत नाही. परंतु काहीना मार्गदर्शन भेटून ही त्यांना त्यांचे महत्व समजत नाही. पण गुरूंच्या मार्गदर्शनाची कमतरता त्याला जाणवते ज्याला आईवडील यांचा ही सहवास नसतो. तो अतिशय खडतर परिस्थितीतून उभा राहिलेला असतो. त्याला गुरूंचे गुरूंचे न मिळालेले मार्गदर्शन याची जाणीव नक्कीच असते. म्हणूनच तो आपल्याला जे मिळाले नाही ते तो नक्कीच दुसऱ्यांना देण्याचे काम आयुष्यभर करत असतो. मग तो आयुष्यात किती ही मोठा व्यक्ती बनला असेल तरी त्यात अभिमान हा त्याच्या कामामध्ये येत नाही. निस्वार्थपणे तो त्याचे काम अखंड अविरतपणे करत असतो.
COMMENTS