प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) आज २ जुलै २०२४ रोजी डिसेंट फाऊंडेशनचे सदस्य व गोळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते र्श्री विकास सिताराम ता...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
आज २ जुलै २०२४ रोजी डिसेंट फाऊंडेशनचे सदस्य व गोळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते र्श्री विकास सिताराम ताम्हणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने अनावश्यक खर्च टाळून दरवर्षी आपला वाढदिवस ते सामाजिक उपक्रमाने साजरा करतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे त्यांनी शिकून मोठे व्हावे याच भावनेतून त्यांनी हा उपक्रम घेतला.
शाळा ही शिक्षणाची मंदिरे आहेत. तिथूनच संस्कारक्षम पिढी घडत असते. आणि म्हणूनच लोकांनी अनावश्यक खर्च टाळून अशा ठिकाणी मदत करावी असे आवाहन यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सौ. पल्लवी वाणी, श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जयवंत डोके, काशिनाथ लोखंडे, अशोक वऱ्हाडी, इतिहासाचे अभ्यासक बापूजी ताम्हणे, पांडुरंग ताम्हाणे,उमेश शिंदे सर, मारूती साबळे सर , विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दत्तात्रय उगले सर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक मोहन नाडेकर यांनी केले. तर आभार किरण पवार सरांनी मानले.
COMMENTS