प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे { सर } आज गुरूवार दिनांक २० जून २०२४ रोजी मढ, ता. जुन्नर, जि. पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट ...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे { सर }
आज गुरूवार दिनांक २० जून २०२४ रोजी मढ, ता. जुन्नर, जि. पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे , शंकरा आय हॉस्पिटल पनवेल व ज्येष्ठ नागरिक संघ मढ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. या शिबिराला मढ,तळेरान,सीतेवाडी, पारगाव,खुबी, करंजाळे परिसरातून नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या शिबिरात १०७ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व ४० नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले.
रुग्णांना तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. तसेच या शिबिरामध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणारा असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले, शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील व त्यांची सर्व टीम, माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र सदाकाळ, डिसेंट फाऊंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रद्धा जोशी, डॉक्टर शमा के, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मस्करे, सचिव मुरलीधर मोढवे, प्रेमानंद आस्वार, ऋषिकेश तांबे, पत्रकार महेश घोलप, राहुल शेटे, अश्विन तांदळे, बाबू हिलम, परिचारिका प्रिया शिरसाट, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS