प्रतिनिधी : सिध्दी तलांडे जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे कमवा आणि शिका योजनेतील २०२३-२४ या वर्षातील विद्यार्थ्यांचा समारो...
प्रतिनिधी : सिध्दी तलांडे
जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे कमवा आणि शिका योजनेतील २०२३-२४ या वर्षातील विद्यार्थ्यांचा समारोप समारंभ राजमाता जिजाऊ सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य वाघमारे सर, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी, प्रा.डॉ.एस.जे.जाधव- वाणिज्य शाखा प्रमुख, प्रा.डॉ.दुशिंग सर - भूगोल विभाग प्रमुख, प्रा.एस.एन.कसबे- विद्यार्थी विकास अधिकारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी शितल भगत, सिध्दी तलांडे, प्रितम मोजाड, आदित्य काळे, श्रुती उत्तर्डे या विद्यार्थ्यांनी मनोगते मांडली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्दी तलांडे हिने केले तर सूत्रसंचालन शितल भगत व सिध्दी तलांडे यांनी केले व आभार सिध्दी तलांडे हिने केले.
COMMENTS