जुन्नर : जुन्नर तालुक्यातील धोलवड गावच्या ग्रामपंचायतीचे विद्यमान कर्मचारी सुभाष मारूती तुळवे यांची पुणे व सातारा श्रमिक संघ महाराष्ट्र रा...
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील धोलवड गावच्या ग्रामपंचायतीचे विद्यमान कर्मचारी सुभाष मारूती तुळवे यांची पुणे व सातारा श्रमिक संघ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून दोन वर्षाकरीता निवड झाली आहे.
खरं तर सुभाष तुळवे यांच्या सामाजिक कार्याची व संघर्षाची तळमळ पाहता त्यांच्याकडून भविष्यात ग्रामपंचायत कर्मचार्यांसंदर्भात समस्या सोडविणे व संघटनेचे ध्येय्य धोरण तथा संघटना मजबूत ठेवण्यासाठी व संघटनेतील समन्वय साधण्याकरीता त्यांची पुणे व सातारा जिल्हा संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना पुणे विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
कॉ.ज्ञानोबा हनुमंत घोणे ( संस्थापक सरचिटणीस ), राजेंद्र शंकरराव वाव्हळ ( अध्यक्ष पुणे जिल्हा जेष्ठ सल्लागार ), अशोक दिनकर गायकवाड ( अध्यक्ष पुणे जिल्हा ), सुनिता ज्ञानेश्वर लांडगे ( महिला अध्यक्षा पुणे जिल्हा ) यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड करण्यात आली व तुळवे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
COMMENTS