आरोग्य टिप्स : पुदिन्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात 'हे' फायदे. | CrimeNama
Loading ...

आरोग्य टिप्स : पुदिन्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात 'हे' फायदे.

  आरोग्य टिप्स : पुदिना आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. पुदिन्यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. पुदिन्यामध्ये सोडियम, पोटॅशियम,...

 


आरोग्य टिप्स : पुदिना आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. पुदिन्यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. पुदिन्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, प्रोटीन आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे शरीरासाठी उपयुक्त ठरू शकतात.

पुदिन्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि पचनाच्या अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. त्याचबरोबर पुदिनाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Mint Leaves Benefits)-

पुदिन्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया वेगवान आणि मजबूत होते. पुदिन्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म अन्न पचवण्यास मदत करतात. त्याचबरोबर पुदिन्याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही गॅस, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, अपचन इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात.

डोकेदुखीपासून सुटका मिळते (Gets relief from headache-Mint Leaves Benefits)-

डोकेदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी पुदिना उपयुक्त ठरू शकतो. डोकेदुखीच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही पुदिन्याचे तेल किंवा बाम वापरू शकतात. पुदिन्यामध्ये आढळणारे गुणधर्म डोकेदुखी सहज दूर करू शकतात.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Mint Leaves Benefits)-

तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर पुदिन्याची पाने तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकते. कारण अनेकदा तणावामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. अशावेळी पुदिनाच्या पानांने सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. कारण पुदिन्याच्या पानाच्या सेवनाने ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

पुदिन्याचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरील लालसरपणा दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

मध (Honey For Redness On Face)-

त्वचेची काळजी घेण्यासाठी मध खूप फायदेशीर ठरू शकतो. मधामध्ये आढळणारे अँटिइफ्लिमेंटरी गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर मधाच्या मदतीने त्वचेवरील लालसरपणा आणि जळजळ दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर मध लावून ठेवावा लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. दिवसातून दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने त्वचेवरील लालसरपणा सहज दूर होऊ शकतो.

कोरफड (Aloevera For Redness On Face)-

कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. म्हणून कोरफड आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावर येणारा लालसरपणा दूर करण्यासाठी कोरफड मदत करू शकते. यासाठी तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावर कोरफडीचा गर साधारण अर्धा तास लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. दिवसातून दोन वेळा कोरफड चेहऱ्यावर लावल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,54,Amaravati,11,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2443,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,584,Dhule,8,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,420,India,235,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,10,Lifestyle,205,Maharashtra,966,Mumbai,240,Nagpur,21,Nashik,28,Politics,328,Pune,1448,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,16,Satara,24,Sindhudurg,3,Solapur,14,Sport,57,Technology,28,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: आरोग्य टिप्स : पुदिन्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात 'हे' फायदे.
आरोग्य टिप्स : पुदिन्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात 'हे' फायदे.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiA0az72-8XYwz277gG3ie2naJ2si-y2WnMNjohJTiK6CMyniqrisgP5ykHlaqPaIqvt46nhqLk2htchTS82x2lZNdeMI8zdZzeVJp9rLA239JDSuckDTjWmcGWIgGKEDb_BSlxzXm0DY4qNf0RrD5ssV3lqmoebwSGtqIyTCAuJdxyuYJ5uvYohKD3/s1600/download.jpeg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiA0az72-8XYwz277gG3ie2naJ2si-y2WnMNjohJTiK6CMyniqrisgP5ykHlaqPaIqvt46nhqLk2htchTS82x2lZNdeMI8zdZzeVJp9rLA239JDSuckDTjWmcGWIgGKEDb_BSlxzXm0DY4qNf0RrD5ssV3lqmoebwSGtqIyTCAuJdxyuYJ5uvYohKD3/s72-c/download.jpeg
CrimeNama
https://www.crimenama.com/2023/05/blog-post_9.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2023/05/blog-post_9.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content