विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर मधील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना यां...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर मधील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना यांच्या कडून जुन्या पेन्शनसाठी 14 मार्चपासून बेमुदत संप पुकारलेला असून महाविद्यालयाच्या आवारातच हे आंदोलन सुरू केलेले आहे. ".एकच मिशन जुनी पेन्शन " या घोषणेचा नारा देऊन 2005 नंतर शासकिय सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी. यासाठी हा बेमुदत संप सनदशीर व लोकशाही मार्गाने सुरू केलेला असून त्याला कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित एकूण ४४ शिक्षकांचा उत्स्फूर्त पाठींबा असून जुन्नर तालुक्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक वर्गाकडून संपाला उस्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे .
यावेळी पुणे विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. समीर श्रीमंते व श्री शिवछत्रपती स्थानिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा शरद मनसुख व उपाध्यक्ष प्रा नचिकेत धर्माधिकारी 'सचिव प्रा प्रदिप चिखले व खजिनदार प्रा गणेश रोकडे , प्रा प्रदिप वालझाडे व प्रा रावसाहेब कोकरे, प्रा निलेश आमले ' प्रा कैलास रुपनर ' प्रा मयूर बोंबले तसेच प्रा संध्या तितर, प्रा कविता शिंदे प्रा अन्नपूर्णा ढोले , प्रा लता बेळे व शिक्षक संघटनेचे सर्वच पदाधिकारी व सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष प्रा समीर श्रीमंते म्हणाले की 'जुनी पेन्शन योजना येणाऱ्या काळासाठी शासकीय सेवेत असणाऱ्या सर्वच लोकांसाठी किती आवश्यक आहे. ती येणाऱ्या काळाची गरजच आहे. त्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने निर्धार करून जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आपण हा संपाचा लढा सुरू ठेवला पाहिजे. तसेच कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा शरद मनसुख म्हणाले की 'भारतीय लोकशाहीने व राज्यघटनेने आपल्याला न्याय हक्क मिळविण्याचा जो अधिकार दिलेला आहे. त्या योग्य अशा सनदशीर मार्गाचा वापर करून आपण जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संपाचा लढा सुरू केलेला आहे .हा लढा आपला सरकार विरुद्ध नसून तो आपल्या न्याय हक्कासाठी आहे. 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना होत लागू नाही त्याचा परिणाम सेवानिवृत्तीनंतर त्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर होत असतो .जो शिक्षक आपल्या भारतीय युवा पिढीचे भविष्य घडवतो त्याचे मात्र भविष्य हे सेवानिवृत्ती नंतर अंधारमय झालेले दिसून येते. तसेच अनेक आर्थिक संकटांना व परिस्थितीला सामोरे जावे लागते म्हणून सरकारने सर्वच शासकीय कर्मचारी वर्गांना जुनी पेन्शन योजना लागू करून सर्व घटकांना न्याय द्यावा ही अपेक्षा आहे .मात्र बारावी बोर्ड परीक्षेच्या कामकाजात सर्वतोपरी सहकार्य करून विद्यार्थी वर्गाचे कुठल्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची काळजी शिक्षक संघटनेने घेतली असून सरकारने यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा ही मागणी केलेली आहे .
COMMENTS