सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथे...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ. लक्ष्मण घोलप समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले, समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर, समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे, आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, उपप्राचार्य विष्णू मापारी, समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश पाडेकर, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना वल्लभ शेळके म्हणाले कि, ब्रिटिश राजवटीतून १५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला.२६ जानेवारी १९५० ला संविधान अर्थात राज्यघटना लागू झाली. देशाप्रति निष्ठा ठेऊन आपल्या कर्तव्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे यावेळी वल्लभ शेळके यांनी सांगितले.
यावेळी समर्थ गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी लेझीम प्रात्यक्षिके सादर केली.
विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर वक्तृत्वाचे सादरीकरण केले.
संगीत शिक्षक राहुल दुधवडे यांनी देशभक्तीपर गीते गायली.
त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.
संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन समर्थ गुरुकुल च्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाशिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे, ज्ञानेश्वर जाधव, किरण वाघ व सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार प्राचार्य अनिल कपिले यांनी मानले.
COMMENTS