सांगली: माडग्याळ-व्हसपेठ हद्दीच्या जवळ शेतातील घरात मुलाने आईचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना जत तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळ...
सांगली: माडग्याळ-व्हसपेठ हद्दीच्या जवळ शेतातील घरात मुलाने आईचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना जत तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
शांताबाई अण्णाप्पा कोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर खून करणारा सुरेश आण्णाप्पा कोरे हा शांताबाई यांचा एकुलता एक मुलगा आहे. जन्मदात्या आईचा दगडाने ठेचून खून केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शांताबाई यांच्या पतीचे पूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे आई आणि मुलगा दोघेच शेतातील घरामध्ये राहत होते. रविवारी दुपारी शेतामध्ये आई आणि मुलगा यांच्यात वादावादी झाली. या वादातून सुरेशने आईच्या डोक्यात दगड घालून आणि दगडाने ठेचून खून केला. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS