क्राईमनामा Live : मिलिंद वसतिगृह व जिजामाता कन्या छात्रालय जुननर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर संविधान दिन वसतिगृहा त म...
क्राईमनामा Live : मिलिंद वसतिगृह व जिजामाता कन्या छात्रालय जुननर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर संविधान दिन वसतिगृहात मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी मिलिंद विद्यार्थी वसतिगृहाचे अधिक्षक प्रशांत धोत्रे व जिजामाता कन्या छात्रालय अधिक्षिका संजिवनी कसबे व प्रमुख पाहुणे म्हणून सतिश शिंदे ( पत्रकार ) व बाळू खरात हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी
वसतिगृहाचे मुख्य अधिक्षक प्रशांत धोत्रे तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा. सतिश शिंदे
( पत्रकार ) व बाळू खरात हे होते. वसतिगृहातील
सर्व कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी माननीय प्रशांत धोत्रे, सतिश शिंदे, बाळू खरात, यांनी
विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त शुभेच्छा व मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी सामुदायिक संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रशांत धोत्रे यांनी केले.
COMMENTS