विशेष प्रतिनिधी – प्रा. निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी वि...
विशेष प्रतिनिधी – प्रा. निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : श्री
शिव छत्रपती महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर संविधान दिन महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जुन्नर तहसील येथील निवासी नायब तहसीलदार मा. सचिन मुंडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डी.व्ही. उजगरे तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा. अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.महादेव
वाघमारे, जुन्नर तहसील येथील अधिकारी व कर्मचारी, प्रबंधक सौ.मनिषा कोरे तसेच महाविद्यालयातील सर्व शाखांचे विभाग प्रमुख, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी माननीय नायब तहसीलदार श्री.सचिन मुंडे यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त शुभेच्छा व मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी कला शाखा प्रमुख डॉ. ए. एस.पाटील यांनी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा . विक्रम रसाळ तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सचिन कसबे यांनी केले.
COMMENTS